आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्नियाच्या नॅशनल पार्कमध्ये 800 फूट ऊंचीवरून खाली पडल्याने भारतीय कपलचा मृत्यू, अॅडव्हेंचर ट्रॅव्हलचा होता छंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - कॅलिफोर्निया येथील योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये 800 फूट उंचीवरून पडून भारतीय वंशाच्या कपलचा मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह पार्कच्या प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट टाफ्ट पॉइंटखाली आढळला. विष्णू विश्वनाथ (29) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी मूर्ती (30) असे त्यांचे नाव आहे. ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहत होते. विष्णू सॅन जोसमध्ये सिस्को कंपनीत सिस्टीम इंजिनीअर होते. 


अॅडव्हेंचर ट्रॅव्हलचा छंद होता 
सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकलच्या मते, विष्णू आणि मिनाक्षीच्या मृतदेहाची ओळख सोमवारी पटली. पर्यटकांनी मृतदेह दिसल्यानंतर अधिकाऱ्यांना माहिती दिली. दोघांना अॅडव्हेंचर ट्रॅव्हलिंगचा छंद होता. विष्णू त्यांनी अनुभवलेल्या प्रवासाबाबत 'हॉलीडे अँड हॅप्पिलीएव्हर आफ्टर' या ब्लॉगमध्ये लिहायचे. विष्णू आणि मीनाक्षी याचे 2014 मध्ये लग्न झाले होते. दोघे सॉफ्टवेअर इंजिनीअर होते. 


हे दोघे नेमके कुठून, केव्हा आणि कसे पडले याबाबत माहिती मिळालेली नाही. पोलिस सध्या त्याचा तपास करत आहेत. योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये फिरायला येणारे पर्यटक या टाफ्ट पॉइंटवर फोटो नक्की काढत असतात. या पॉइंटखाली खोल दरी आहे. त्यामुळे मृतदेह काढायला त्रास झाला. त्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...