आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी इज बॅक - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडच्या एकदिवसीय आणि टी-20 दौऱ्यासाठी महेंद्रसिंह धोनीचे संघात पुनरागमन, बीबीसीआयने महेंद्रसिंह धोनीबाबत घेतला हा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पोर्ट डेस्क : बीसीसीआयने सोमवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन एकदिवसीय सामने आणि न्यूझीलँड विरूद्ध पाच एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. तिन्ही मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला संघात स्थान दिले आहे. याआधीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेदरम्यान धोनीला विश्रांती देण्यात आली होती. 


विश्वकपआधी धोनीला जास्तीत जास्त संधी देण्याची बीसीसीआयचा मानस

 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकपू्र्वी धोनीला अधिकाधिक संधी देण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होणार आहे. तर 10 फेब्रुवारीला न्यूझीलँडचा दौरा पूर्ण होणार आहे. या एका महिन्याच्या कालावधीत महेंद्रसिंह धोनीला 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलँड दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ पाच वनडे आणि दोन टी-20 सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर भारतीय संघ वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


हार्दिक पांड्याची तिन्ही मालिकांसाठी निवड

पाठीच्या दुखण्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळू न शकलेला हार्दिक पांड्याची सुद्धा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच न्यूझीलँड दौऱ्यासाठी देखील त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. 

 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड विरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी जाहिर केलेला संघ
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडु, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

 

- न्यूझीलँड विरुद्ध टी-20 मालिकेसाठी जाहिर केलेला संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद

बातम्या आणखी आहेत...