आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या जर्सीमध्ये टीम इंडियाचे पहिले Photo Shoot, समोर आला धोनी-विराटचा First Look

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीचा रंग आता निळ्यावरून भगवा करण्यात आला आहे. नवीन लुकमध्ये टीम इंडियाच्या सदस्यांचे फर्स्ट फोटोशूट समोर आले आहे. त्यामध्ये कर्णधार विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी आणि मोहंमद शमीसह इतर खेळाडू ऑरेंज आणि ब्लू रंगांच्या जर्सीमध्ये दिसून येत आहेत. क्रिकेट वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात रविवारी पहिल्यांदा टीम इंडियाचा नवीन रंग दिसणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाने ट्विटवर काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

📸📸 How many likes for this jersey ? #TeamIndia

A post shared by Team India (@indiancricketteam) on

 


टीम इंडियाची एकदिवसीय जर्सी किट याच वर्षी लॉन्च करण्यात आली आहे. निळ्या आणि भगव्या रंगात युवकांचा जोश आणि निर्भीळ भारतीय स्पिरिट दर्शवतात असे जर्सी बनवणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले. भारतीय टीमच्या जुन्या जर्सीचा रंग आणि इंग्लंड टीमच्या जर्सीचा रंग एकसारखा असल्याचा दावा होता. त्यानंतर भारतीय टीमच्या जर्सीच्या रंग बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर राजकारण सुद्धा झाले आहे. विरोधीपक्षांनी यासाठी भाजवर भगवीकरणाचा आरोप केला होता. देशातील सत्ताधारी भाजपने क्रिकेट टीममध्ये देखील राजकारण आणल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला.

बातम्या आणखी आहेत...