Home | Sports | Cricket | Off The Field | Indian cricket team using 1983 planning for 2019 world cup

२०१९ मध्ये १९८३ चे सूत्र : ३६ वर्षांनंतर प्रथमच विश्वचषक संघात ६ फलंदाज, ४ अष्टपैलूंची निवड

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 09:50 AM IST

भारताचा सलामी सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार

 • Indian cricket team using 1983 planning for 2019 world cup

  मुंबई-टीम इंडिया सज्ज आहे, येत्या ३० मेपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या वनडे विश्वचषकासाठी. इंग्लंडमधील या वर्ल्डकपसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर केला. यादरम्यान वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर देण्यात आली. तसेच उपकर्णधारपदी रोहितची निवड करण्यात आली.


  भारतीय संघात चौथ्या स्थानासाठीच्या फलंदाजीचा दावेदार मानल्या जाणाऱ्या अंबाती रायडूला संधी मिळालेली नाही. लोकेश राहुल आणि विजय शंकर यांच्यावर मदार असेल. याशिवाय महेंद्रसिंग धोनीसाठी बॅकअप यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी दिनेश कार्तिकला संधी मिळाली. त्यामुळे ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली. याशिवाय वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघामध्ये प्रथमच चार विशेषज्ञ ऑलराउंडर्सचा समावेश करण्यात आला. यामध्ये हार्दिक पांड्यासह विजय शंकर, रवींद्र जडेजा आणि केदार जाधवचा समावेश आहे.


  विराट कोहली (कर्णधार)
  227 सामने 10843 धावा
  59.6 सरासरी 25 शतके
  {सर्वोत्तम फलंदाज। आक्रमक कर्णधार। सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक


  विजय शंकर (ऑलराउंडर)
  9 सामने 165 धावा 33 सरासरी 2 विकेट
  {ऑलराउंडर। वेगाने धावांसाठी क्षमता. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक.


  कुलदीप (गोलंदाज)
  44 सामने 87 बळी 21.74 सरासरी 5/47 बेस्ट
  {चायनामॅन स्पिनर. फ्लाइट आणि लेंथ व्हेरिएशनमध्ये सरस


  रोहित शर्मा (उपकप्तान)
  206 सामने 8010 धावा 47.4 सरासरी 22 शतके
  {मोठी खेळी करण्यास सक्षम. डावपेचाचीही आहे माहिती


  केदार जाधव (ऑलराउंडर)
  59 सामने 1174 धावा 43.48 सरासरी 27 बळी
  {स्पिन ऑलराउंडर. फिनिशर. गोलंदाजीसाठी अधिक सक्षम.


  यजुवेंद्र चहल (गोलंदाज)
  41 सामने 72 बळी 24.61 सरासरी 5/47 बेस्ट
  {फ्लॅफ ट्रॅकवर प्रभाव पाडू शकतो. गुगली बॉलर.


  धोनी (यष्टिरक्षक)
  341 सामने 10500 धावा 50.72 सरासरी 10 शतके
  { विकेटकीपिंग आणि इनपुटने मॅचला कलाटणी देऊ शकतो.


  हार्दिक (ऑलराउंडर)
  45 सामने 731 धावा 29.24 सरासरी 44 विकेट
  {पहिली पसंती ऑलराउंडर.हार्ड हिटर। आक्रमक फिनिशर।


  भुवनेश्वर (गोलंदाज)
  105 सामने 118 बळी 35.66 सरासरी 5/47 बेस्ट
  {चेंडु स्विंग करण्यास तरबेज. डेथ आेव्हरमध्ये चांगली खेळी


  शिखर धवन (सलामीवीर)
  128 सामने 5355 धावा 44.62 सरासरी 16 शतके
  {वेगाने धाव काढू शकतो. मोठी खेळी करण्यास सक्षम.


  रवींद्र जडेजा (ऑलराउंडर)
  151 सामने 2035 धावा 29.92 सरासरी 174 बळी
  {अनुभवी ऑलराउंडर. बेस्ट क्षेत्ररक्षक. चांगला गोलंदाज


  मोहंमद शमी (गोलंदाज)
  63 सामने 113 बळी 26.11 सरासरी 5/47 बेस्ट
  {140+ ची स्पीड। जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग करण्यात तरबेज.


  केएल राहुल (फलंदाज)
  14 सामने 343 धावा 34.30 सरासरी 1 शतक
  {राखीव सलामीवीर. मधल्या फळीत खेळण्यामध्ये तरबेज.


  दिनेश कार्तिक (कीपर)
  91 सामने 1738 धावा 31.03 सरासरी 0 शतक
  {बॅकअप विकेटकीपर। पुढे फिनिश करण्यातही मािहर.


  बुमराह (गोलंदाज)
  49 सामने 85 विकेट 22.15 सरासरी 5/47 बेस्ट
  {जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज. यॉर्कर स्पेशालिस्ट.


  ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला बॅकअप यष्टिरक्षकाची संधी मिळाली. याची दोन कारणे आहेत. पंतची विकेटकीपिंग दुबळी आहे. दुसरे म्हणजे दबावाच्या परिस्थितीमध्ये फलंदाजीच्या बळावर सामना काढण्यामध्ये कार्तिक अधिक विश्वासू असल्याचा व्यवस्थापनाचा भरवसा आहे. कार्तिकने आपली क्षमता निदहास ट्रॉफीत सिद्ध केली. अशाच प्रकारे अंबाती रायडूला मागे ठेवून विजय शंकरला पसंती देण्यात आली. रायडूला सुरुवातीला संधी देण्यात आल्या. मात्र, त्यापेक्षाही विजय शंकर सरस असल्याचे लक्षात आले.


  टीम इंडियाची बलस्थाने
  1. सर्वोत्कृष्ट टॉप ऑर्डर : रोहित, धवन, विराट कोहली. तिघेही मॅच विनर. टॉप ऑर्डर जगातील सर्वोत्कृष्ट. वनडेत ६३ शतके.


  2. डेथ ओव्हर गोलंदाजी : भुवनेश्वर, बुमराहची गत दोन वर्षांत सर्वोत्तम गोलंदाजी. विदेशातील चांगली कामगिरी, हे त्यांचे यश.


  3. रिस्ट स्पिनर्स : सध्या रिस्ट स्पिनर्सचा दबदबा आहे. भारताचे कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यात तरबेज आहेत.


  टीम इंडियाचा दुबळेपणा
  1. मधली फळी : ३०० धावांचा पाठलाग करताना टॉप-३ फ्लॉप झाले तर मधली फळी अपयशी. धोनीत प्रभावशील प्रतिभा नाही. जाधव व हार्दिकने सामना काढला नाही. विजय आणि लोकेश अद्याप विश्वासू नाहीत.


  २. लेफ्ट हँड बॅट्समन : भारताकडे शिखर धवनशिवाय कोणीही डावखुरा फलंदाज नाही. यामुळे बॅटिंग शैलीत नावीन्य येते. रवींद्र जडेजा लेफ्ट हँड आहे.

Trending