आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - अत्याधुनिक तंत्र प्रणालीमुळे क्रिकेटच्या वर्ल्डकपने आतापर्यंतच्या आयाेजनाच्या तुलनेत झपाट्याने प्रगती साधली. टेक्नाॅलॉजीच्या वापरास १९९२ च्या वर्ल्डकपपासून सुरुवात झाली. यादरम्यान थर्ड अम्पायर ही संकल्पना समाेर आली. २००८ मध्ये डीआरएसला पसंती देण्यात आली. त्यामुळे निर्णय देण्याच्या प्रक्रियेत माेठी प्रगती साधल्या गेली.
त्यानंतर २०१५ च्या वर्ल्डकपदरम्यान पहिल्यांदा एलईडी स्टम्पचा वापर करण्यात आला. यामुळे धावबादच्या किचकट वाटणाऱ्या निर्णयात पारदर्शकता आली. त्यामुळे प्रत्येक वर्षी क्रिकेटमधील प्रगतीच्या वाढत्या आलेखामध्ये अत्याधुनिक तंत्रप्रणालीचे माेलाचे याेगदान राहिले.
यंदाच्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे क्रिकेटपटू आता नव्या डिव्हाइसचा वापर करणार आहेत. यातून वर्कलाेडची माहिती मिळण्यास मदत हाेईल. या तंत्र प्रणालीचा वापर मँचेस्टर युनायटेड आणि बार्सिलाेनासारखे संघ आपल्या फुटबाॅलपटूंसाठी वापरतात.
या तंत्र प्रणालीमुळे खेळाडूंना माेठा फायदा
1. भारतीय क्रिकेटपटू आपल्या जर्सीमध्ये हाय-रिझोल्युशनची जीपीएस परफॉर्मन्स ट्रॅकिंग डिव्हाइस (वेस्ट) घालणार आहेत.
2. डिव्हाइस खेळाडूंच्या मैदानावरच्या हालचालींच्या गतीला नियंत्रित करणार आहे. तसेच शरीरच्या हालचाली व तणावाचीही नोंद करेल.
3. या तंत्र प्रणालीच्या आधारे खेळाडूंचा रियल टाइमचा डाटा हा फिजिओ आणि ट्रेनरला पाहता येणार आहे.
डिव्हाइस खेळाडूंची फिटनेस पातळी तपासणार
भारतीय क्रिकेटपटू आपल्या जर्सीच्या आत हाय-रिझाोल्युशनची ही तंत्र प्रणाली वापरतील. ही प्रणाली मैदानावर खेळाडूंच्या वर्तनाला माॅनिटर करेल. याशिवाय वर्कलाेडची ही माहिती देण्यासाठी ही प्रणाली सक्रिय असेल. हे डिव्हाइस वापरण्यासाठी अधिक साेपे आहे. यातून खेळाडूंच्या अनेक गाेष्टींना नियंत्रित केले जाईल. शरीर कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे, याचीही माहिती यातून मिळेल. यातून खेळाडूंची फिटनेस पातळी तपासली जाईल.
खेळाडूंच्या तणावाला नियंत्रित करण्यास मदत
भारतीय क्रिकेटपटू हे जगात सर्वात व्यग्र आहेत. त्यांनी नुकतीच आयपीएल स्पर्धा खेळली. आता २४ मेला न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. हाच तणाव हे टेक्निक नियंत्रित करेल.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या संघांनी केला याचा वापर
या डिव्हाइससाठी बीसीसीआयने इंग्लंडच्या कंपनी स्टेटस्पोर्ट््ससाेबत करार केला. आॅस्ट्रेलिया, इंग्लंड व श्रीलंका टीमने ही प्रणाली वापरली. सरावाशिवाय सामन्यादरम्यानही खेळाडू याचा वापर करू शकतात.
स्पर्धेच्या कव्हरेजसाठी पहिल्यांदाच स्पायडरकॅमचा हाेणार वापर
> आयसीसीने यंदा वर्ल्डकपच्या कव्हरेजसाठी माेठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्र प्रणालीच्या वापरास पसंती दिली. यासाठी प्रथमच स्पाॅयडरकॅमचा वापर केला जाईल. यात २४ समालाेचक असतील. प्रत्येक सामन्याच्या कव्हरेजसाठी ३२ कॅमरे लावण्यात येणार आहेत. याशिवाय आठ अल्ट्रा-माेशन हाॅक-आय कॅमेऱ्यांसह फ्रंट व रिव्हर्स व्ह्यू स्टम्प कॅमेऱ्याचाही वापर केला जाईल. त्यामुळे ४६ दिवसांत ४८ सामन्यांचे कव्हरेज केले जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.