आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये भारतीय उच्चायुक्तांची ISI कडून हेरगिरी, प्रत्येक ठिकाणी पाठलाग; गॅस, इंटरनेट कनेक्शन केले बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांना तेथील गुप्तहेरांकडून त्रास दिला जात आहे. अनेकांचे गॅस आणि इंटरनेट कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारताशी संवाद साधणे सुद्धा कठिण बनले आहे. विचित्र नियमांखाली कुठल्याही भारतीय अधिकाऱ्याला गॅसचे कनेक्शन नकारले जात आहे. एका भारतीय उच्चायुक्ताच्या घरात तर काही अनोळखी व्यक्ती पाकिस्तानी अधिकारी असल्याचे सांगत घुसले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने हे प्रकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नजरेत आणले आहे.


उच्चायुक्तांच्या पाहुण्यांना दिला जातोय त्रास
भारतीय अधिकाऱ्यांना लावलेल्या आरोपानुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी त्यांना विनाकारण त्रास देत आहेत. भारतीय उच्चायुक्तांची भेट घेणाऱ्या आणि त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची सुद्धा कधीही अचानक झडती घेत चौकशी केली जात आहे. अशात त्यांना प्रश्नोत्तरांच्या बहाण्याने धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत. उच्चायुक्तांची हेरगिरी आयएसआयने वाढवली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाकिस्तानी गुप्तहेर बारकाईने नजर ठेवून आहेत. कुठेही जात असताना भारतीय अधिकाऱ्यांचा पाठलाग केला जात आहे.


यापूर्वीही आल्या अशा तक्रारी
भारताने एका महिन्यापूर्वी पाकिस्तानचे उप-राजदूत सय्यद हैदर शाह यांना बोलावून भारतीय उच्चायुक्तांना दिल्या जाणाऱ्या त्रासांची माहिती दिली होती. त्यावेळी भारतीय उच्चायुक्तांना लाहोरला गेलेल्या शिख बांधवांची भेट घेण्यासाठी अडवण्यात आले होते. त्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आधीच या भेटींची परवानगी दिली होती. तरीही पोलिस आणि गुप्तचर विभागाने त्यांना असे करण्यापासून अडवले होते. तत्पूर्वी मार्चमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. भारताने पाकिस्तानला याबाबत एक पत्र देखील पाठवले होते.

बातम्या आणखी आहेत...