आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Economy : GDP Growth At 45 Percentage In july September It Is Worst In More Than 6 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय अर्थव्यवस्था गेल्या सहा वर्षांतील बिकट स्थितीत, जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी दर 4.5 टक्क्यांवर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतीकात्मक फोटो

नवी दिल्ली - देशाचा जीडीपी दर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घटून 4.5 टक्क्यांवर आली आहे. गेल्या 26 तिमाहींमधील हा सर्वात निच्चांक आहे. यापूर्वी जानेवारी-मार्च 2013 मध्ये भारताचा जीडीपी दर 4.3% राहिला होता. एप्रिल ते जून या कालावधीत ही वाढ 5% आणि मागील वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये 7% होती. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत जीडीपी 4..8% नोंदली गेली. गेल्या वर्षी याच सहामाहीत जीडीपी दर 7.5% होता.सलग सहाव्या तिमाहीत जीडीपीत घसरण

तिमाहीजीडीपी वाढ
एप्रिल - जून 2018    8%
जुलै - सप्टेंबर 2018     7%
ऑक्टोबर - डिसेंबर 2018     6.6%
जानेवारी - मार्च 2019    5.8%
एप्रिल -  जून  2019    5%
जुलै - सप्टेंबर 2019   4.5%

तिसर्‍या तिमाहीपासून वाढ अपेक्षित


मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यन म्हटले की, देशाची अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) पासून जीडीपीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...