आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमानमधील ढगफुटीत माजलगावचे खैरुल्ला खान कुटुंबासह बेपत्ता; ओमान सरकार घेत आहे शोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - आखातातील ओमानमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या मुलास भेटण्यासाठी गेलेले माजलगाव येथील खैरुल्ला खान व त्यांचे कुटुंबीय त्या देशात शनिवारी झालेल्या ढगफुटीत बेपत्ता झाले आहे. ओमान सरकार हेलिकॉप्टरद्वारे त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. माजलगावात खान कुटुंबीयांना त्यांच्या मुलाच्या मित्राने फोन करून माहिती दिली. खैरुल्ला खान हे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आहेत.


माजलगाव येथील बुखारी शाळेतील माजी शिक्षक खैरुल्ला खान सत्तार खान (५२) पत्नी शबानासह रमजाननिमित्त मस्कत शहरात असलेला मुलगा सरदार खानला (३०) भेटण्यासाठी ६ मे रोजी माजलगाव येथून गेले होते.  शनिवारी मुलगा सरदार खान, पत्नी शबाना, सून अरशी खान व नातवंडे ४ वर्षीय मुलगी सिद्रा, २ वर्षीय मुलगा जहेंद व २२ दिवसांचा एक मुलगा असे सर्व ७ जण मिळून एका कारने पर्यटनस्थळ असलेल्या वादी दिन खालिद येथे जात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळच्या ७ वाजता ) अचानक धुके पसरून परिसर धुक्यात हरवला आणि प्रचंड पाऊस सुरू झाला. या वेळी खान कुटुंबीयांची गाडी नदी परिसरात पूल पार होत होती. पुलावर पाणीच पाणी होते, वाहतूक ठप्प होती. समोर काय घडतेय हे पाहण्यासाठी मुलगा सत्तार खान गाडीबाहेर उतरले. त्याच वेळी पाण्याची प्रचंड लाट आली आणि कार वाहून गेली. सत्तार खान यांचा जीव वाचला. परंतु इतर सदस्य वाहून गेले. ओमानमध्ये नोकरीनिमित्त राहणाऱ्या मराठवाड्यातील काही लोकांनी स्थानिक प्रशासनाला ही माहिती दिली. दरम्यान, ओमान सरकारने हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम सुरू केली आहे. 

 

बहीण, आत्याला फोन करून माहिती 
सरदार खान यांनी बहीण व आत्याला फोन करून सर्वात आधी या घटनेची माहिती दिली. माजलगावात आरेफ खान यांचे दुसरे भाऊ राहतात. सध्या ते प्रचंड काळजीत आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी रविवारी दुपारपर्यंत तरी संपर्क केलेला नव्हता. सर्व सुखरूप परतावेत यासाठी माजलगावात दुआ करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...