Home | Sports | From The Field | indian football team play two matches before world cup qualifiers

विश्वकरंडक पात्रता सामन्यापूर्वी भारतीय फुटबॉल संघाचे दोन सराव सामने

Agency | Update - May 23, 2011, 03:32 PM IST

भारतीय फुटबॉल संघ विश्‍वकरंडक पात्रता फेरीतील पहिल्या लढतीपूर्वी दोन सराव सामने खेळेल.

  • indian football team play two matches before world cup qualifiers

    नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघ विश्‍वकरंडक पात्रता फेरीतील पहिल्या लढतीपूर्वी दोन सराव सामने खेळेल.

    विश्वकरंडक पात्रता सामन्यात भारताची संयुक्त अरब अमिरातीशी लढत आहे. 23 जुलै रोजी अमिरातीत; तर 28 जुलै रोजी भारतात सामना होईल. त्याआधी मालदीवविरुद्ध 10 जुलैला; तर कतारविरुद्ध 17 जुलैला भारत मित्रत्वाचे सामने खेळेल. दोन्ही सामने परदेशात होतील. जागतिक क्रमवारीत अमिरातीचा 111वा; तर भारताचा 145वा क्रमांक आहे. राष्ट्रीय संघाचे संचालक तथागत मुखर्जी यांनी सांगितले, की अमिरातीविरुद्धचे सामने आव्हानात्मक आहेत. त्यासाठी योग्य पद्धतीने तयारी व्हायला हवी म्हणून सराव सामने घेतले आहेत. परदेशातील सामने महत्त्वाचे ठरतील. कतारमधील परिस्थिती व हवामान अमिरातीसारखेच असेल. पहिल्या सामन्यापूर्वी आखातात सराव शिबिरही आयोजित केले जाईल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहू देणार नाही.

Trending