Home | National | Gujarat | Indian Gay Prince Open His Palace Grounds To LGBT Special Story

हे आहेत भारताचे पहिले 'गे' राजकुमार, लग्नानंतर झाली होती जाणीव, आले मोठे वादळ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 01:57 PM IST

गुरुवारी सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधांवर ऐतिहासिक निकाल देत त्यांना गुन्ह्यांतून मुक्त केले आहे.

 • Indian Gay Prince Open His Palace Grounds To LGBT Special Story

  नर्मदा/सुरत - गुरुवारी सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधांवर ऐतिहासिक निकाल देत त्यांना गुन्ह्यांतून मुक्त केले आहे. दोन प्रौढांमध्ये सहमतीने बनलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा न मानण्याविषयी दाखल याचिकेवर कोर्टाने हा निकाल दिला. केंद्रालाही याबाबत त्यांची भूमिका विचारण्यात आली होती. DivyaMarathi.Com यानिमित्ताने अशा भारतीय राजकुमाराची स्टोरी सांगत आहे ज्यांनी स्वत:हून जाहीर स्वीकारले की ते 'गे' (समलैंगिक) आहेत.


  - वास्तविक, आपण 'गे' असल्याची बाब स्वत:हून स्वीकारल्यानंतर राजपीपला (गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एक शहर) चे राजकुमार 'गे' मानवेंद्र यांना भारतातच नाही, विदेशातही प्रसिद्धी मिळाली.

  - मानवेंद्र गोहित समलैंगिकांसाठी काम करतात. त्यांनी राजपीपलामध्ये समलैंगिकांसाठी एका वृद्धाश्रमाचीही स्थापना केली आहे.
  - या आश्रमाचे नाव अमेरिकन लेखिका 'जेनेट'वर ठेवण्यात आले आहे. हे भारतातीलच नाही, तर पूर्ण आशियातील पहिले 'गे' आश्रम आहे.

  लग्नानंतर झाली जाणीव, मग आले मोठे वादळ...
  - 23 सप्टेंबर 1965 रोजी महाराजा रघुबीरसिंहजी राजेंद्रसिंहजी साहेब यांच्या घरात एका मुलाचा जन्म झाला होता.
  - राजस्थानच्या अजमेरमध्ये जन्मलेल्या या बालकाचे नाव मानवेंद्र ठेवण्यात आले. त्याचे जीवनही साधारण पुरुषांप्रमाणे सुरू होते.
  - त्यांचे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि अमृतबेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबईतून झाले.
  - 1991 मध्ये मध्य प्रदेशातील झाबुआच्या चंद्रेश कुमारी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात वादळ आले, एका वर्षानंतर म्हणजेच 1992 मध्ये दोघेही वेगळे झाले होते.
  - दोघांचे लग्न मोडण्याचे सर्वात मोठे कारण राजकुमार समलैंगिक असल्याचे सांगण्यात आले.

  विदेशी महिलेने दिले सर्वात जास्त दान
  - आश्रमाच्या या नावावर मानवेंद्र सिंह म्हणाले की, जेनेटने या आश्रमासाठी सर्वात अधिक रक्कम दान केली होती.
  - यासोबतच त्यांचे असेही म्हणणे आहे की, जेनेट ‘गे’ नाही, तरीही त्यांनी या आश्रमासाठी सर्वात जास्त योगदान दिले. यामुळे आश्रमाचे नाव त्यांच्याच नावावर ठेवणे आणखी महत्त्वपूर्ण ठरले होते.

  'गे' आश्रमाची आयडिया
  - मानवेंद्र यांनी सांगितल्यानुसार, 'गे' आश्रम स्थापन करण्याची आयडिया त्यांना 2009 मध्येच आली होती आणि तेव्हापासूनच त्यांचे प्रयत्न सुरू होते.
  - आश्रमाचे उद्घाटन जेनेट यांची बहीण कर्लाफाइन यांनी केले. त्या अपल्या पतिसोबत विशेषकरून अमेरिकेतून येथे आल्या होत्या.
  - या वृद्धाश्रमात तब्बल 50 समलैंगिकांना राहण्याची व्यवस्था आणि सोबतच मनोरंजन व स्विमिंग पूलच्या सुविधाही असतील.
  - वृद्धाश्रमाची निर्मिती 15 एकर जमिनीवर होत आहे. 25 ते 30 खोल्या बांधल्या जातील. सध्या येथे 4 रूमची व्यवस्था आहे. येणाऱ्या काही दिवसांत येथे 25 ते 30 खोल्या बांधल्या जातील.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या गे राजकुमाराचे आणखी फोटोज...

 • Indian Gay Prince Open His Palace Grounds To LGBT Special Story
 • Indian Gay Prince Open His Palace Grounds To LGBT Special Story
 • Indian Gay Prince Open His Palace Grounds To LGBT Special Story
 • Indian Gay Prince Open His Palace Grounds To LGBT Special Story
 • Indian Gay Prince Open His Palace Grounds To LGBT Special Story

Trending