Home | National | Other State | Indian great cook and one of oldest YouTubers dies at 107

11 वर्षांच्या असताना झाले लग्न, पण 22व्या वर्षी झाल्या विधवा, एकटीने सांभाळली पूर्ण कुटुंबाची जबाबदारी..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 06:51 PM IST

105 वर्षाच्या असताना सुरू केले हे काम, जगभरातून झाले कौतुक.

 • Indian great cook and one of oldest YouTubers dies at 107

  गुंटूर- यू-ट्यूबची पॉपुलर शेफ कारे मस्तानम्माचे 107 व्या वर्षी निधन झाले. त्या आंध्रप्रदेशच्या गुडिवाड़ाच्या रहिवासी होत्या. त्यांनी गुंटूरमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्या यू-ट्यूबवर गावातील साध्या पद्धतीने जेवण बनवण्यासाठी लोकप्रिय होत्या. कंट्री फूड नावाचे यू-ट्यूब चॅनल त्यांच्या नातवाने सुरू केले होते आणि त्यांचे 8 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत.

  देशी स्टाईलने कुकिंग

  - कारे यांची कुकिंगची स्वत ची एक वेगळी पद्धत होती. त्या त्यांच्या जेवणात शेतातील ताज्या भाज्यांचा वापर करायच्या.

  - त्यांच्या किचनमध्ये आजप्रमाणे नवीन गॅजेट नव्हते, तर त्या त्यांच्या शेतात मातीच्या चुलीवर जेवण बनवायच्या.

  - 11 वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना 5 मुले आहेत. त्या फक्त 22 वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर आली.

  - त्या आधीपासूनच अॅक्टिव्ह आणि हार्डवर्किंग होत्या. जेवण बनवणे त्यांचे आवडीचे काम होते. त्यांचा नातू कारे लक्ष्मणने त्यांच्यातले हे टॅलेंट ओळखले आणि त्यांचे व्हिडिओ बनवून कंट्री फूड नावाच्या यूट्यूबवर चॅनेलवर टाकणे सुरू केले.


  - या चॅनेलची सुरुवात 19 ऑगस्ट 2016 मध्ये झाली होती, त्या वेळेस त्यांचे वय 105 होते. फक्त 2 वर्षांत त्या यू-ट्यूबच्या सगळ्यात लोकप्रिय शेफ बनल्या.

  सगळ्यात जास्त पॉप्युलर रेसिपी

  - कारे यांची सगळ्यात लोकप्रिय रेसिपी वॉटरमेलन चिकन आहे, या डिशला आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त लोकांना पाहीले आहे. त्यासोबतच चिकन बिर्यानी आणि इमू मीट कढीचे देखील खूप लोकप्रिय झाले आहेत.

 • Indian great cook and one of oldest YouTubers dies at 107
 • Indian great cook and one of oldest YouTubers dies at 107
 • Indian great cook and one of oldest YouTubers dies at 107
 • Indian great cook and one of oldest YouTubers dies at 107

Trending