Home | Sports | From The Field | Indian Head Coach Ravi Shastri Praises MS Dhoni said he is legend 

शास्त्रींनी केले धौनीचे कौतुक म्हणाले-त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही, दशकांत एकदा जन्म घेतो असा क्रिकेटपटू 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 19, 2019, 02:22 PM IST

धोनीने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात झालेल्या वन डे सिरीजमध्ये प्रत्येक मॅचमध्ये अर्धशतक केले. 

 • Indian Head Coach Ravi Shastri Praises MS Dhoni said he is legend 

  मेलबर्न - भारतीय टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, टीममध्ये महेंद्रसिंह धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत धोनी आहे प्रत्येक भारतीयाने क्रिकेटचा आनंद लुटायला हवा. एका वृत्तपत्राशी बोलताना शास्त्री म्हणाले की, धोनीसारखे खेळाडू दशकांतून एकदा जन्म घेतात. शास्त्री म्हणाले की, त्यांनी सचिन तेंडुलकरला अनेकदा नाराज होताना पाहिले आहे, पण धोनीला नाही.


  धोनी लीजेंड आहे..
  शास्त्री म्हणाले, तो लीजेंज आहे. आपल्या महान क्रिकेटपटुंपैकी एक आहे. मी कोणत्याही एवढा शांत व्यक्ती आजवर पाहिला नाही. मी भारतीय जनतेला सांगेल की, तोपर्यंत धोनी आहे तोपर्यंत खेळाचा मनमुराद आनंद लुटा. कारण जेव्हा धोनी जाईल तेव्हा एक मोठी पोकळी निर्माण होईल, ती भरून काढणे कठीण असेल.


  धोनीने बॅटने दिले टीकाकारांना उत्तर
  गेल्या काही वर्षांपासून धोनीच्या टीममध्ये कायम राहण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. पण धोनीने ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील तिन्ही सामन्यांत अर्धशतके करत टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्याच्या खेळींमुळेच भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात दुहेरी मालिकेत पराभूत केले.

  विकेटमागेही चांगले योगदान
  धोनी यंदाच्या इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या वर्ल्डकप टीमचा अविभाज्य भाग असल्याचे मानले जात आहे. शास्त्री म्हणाले, विकेटमागेही त्याचे योगदान मोलाचे आहे. कोचच्या मते, तो योग्य प्रकारे अंदाज लावतो, त्यामुळे त्याचे संघात आदराचे स्थान आहे. ही पूर्ण टीम त्याने उभी केली आहे. त्याचे कारण म्हणजे, 10 वर्षांपर्यंत तो कर्णधार राहिलेला आहे. ड्रेसिंग रूममध्ये असा अनुभव असणे फार मोठी बाब आहे.

Trending