आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघाने 83 वर्षांनंतर उडवला युरोपियन टीमचा 10-0 ने धुव्वा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह- पाच वेळचा चॅम्पियन भारतीय हॉकी  संघ आता सहाव्यांदा सुलतान अझलन शहा चषक आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी भारताच्या हॉकी संघाने साखळी सामन्यात धडाकेबाज एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने साखळीच्या शेवटच्या सामन्यात पोलंडचा पराभव केला. भारताने १०-० अशा फरकाने सामना जिंकला. वरुण कुमार (१८, २५ वा मि.), मनदीप (५०, ५१ वा मि.), विवेक प्रसाद (१ वा मि.), सुमीत कुमार (७ वा मि.), सुरेंदर कुमार (१९ वा मि.), नीळकंठ (३६ वा मि.), अमित रोहिदास (५५ वा मि.) यांनी गोल करून भारतासाठी विजयश्री खेचून आणली.  भारताने ८३ वर्षांनंतर युरोपियन टीमविरुद्ध सर्वाधिक १० गोल केले आहेत. भारताने १९३६ बर्लिन आॅलिम्पिकमध्ये फ्रान्सविरुद्ध १०-० गोल केले होते.   

यासह भारताने आपली विजयी मोहीम कायम ठेवली. आता किताबासाठी भारत आणि कोरिया यांच्यात आज शनिवारी अंतिम सामना रंगणार आहे. आशियाई चॅम्पियन भारतीय संघाने आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचा चषक पटकावला. एक वेळ भारताला संयुक्तपणे या चषकाचा बहुमान मिळाला.

 

वरुण, मनदीपचा डबल धमाका  
भारताच्या विजयामध्ये वरुण कुमार आणि मनदीप सिंगने प्रत्येकी दोन गोलचे मोलाचे योगदान दिले. त्यांनी दुबळ्या पोलंडच्या सुमार खेळीचा समाचार घेत सामन्यात गोलचा डबल धमाका उडवला. वरुण कुमारने १८ आणि २५ अशा प्रकारे सात मिनिटांच्या फरकात दोन गोल केले. तसेच मनदीपने एक मिनिटांच्या फरकाने सलग दोन गोल केले. त्याने ५० व ५१ व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे भारताला मोठ्या फरकाने विजयाची नोंद करता आली.

बातम्या आणखी आहेत...