आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनू मलिकच्या हकालपट्टीनंतर आता परीक्षकपदी हिमेश रेशमियाची वर्णी, म्हणाला - माझी जबाबदारी दुपटीने वाढली आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः #MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर संगीतकार-गायक अनु मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वाच्या परीक्षकपदावरून माघार घ्यावी लागली. त्याने हा शो सोडल्यानंतर आता गायक-संगीतकार हिमेश रेशमिया परीक्षकपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे आता विशाल दादलानी आणि नेहा कक्कडसोबत हिमेश रेशमिया या पर्वात पाहायला मिळणार आहे.

हिमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि स्पर्धकांसोबतचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

हिमेशीची एन्ट्री झालेल्या एपिसोडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू शोमध्ये दिसणार आहेत.  

  • माझी जबाबदारी दुपटीने वाढली - हिमेश

हिमेश म्हणाला, "'मी 'सुपरस्टार सिंगर'चा एक भाग होतो आणि आता माझा हा प्रवास 'इंडियन आयडॉल'सोबत सुरु राहणार आहे. हा फक्त भारतातील सर्वाधिक काळ चाललेला शोच नाहीये तर आयकॉनिक शोपैकी एक आहे. मी जज पॅनलमध्ये सहभागी झाल्याने आनंदी आहे. माझी जबाबदारी आता दुपटीने वाढली आहे. मी हा सीझन पहिल्या एपिसोडपासून फॉलो करतोय आणि अनेक प्रतिभावंत गायक येथे आहेत. निश्चितच म्युझिक इंडस्ट्रीत एका नवीन प्रवाहाला सुरुवात होणार आहे.''

  • नोव्हेंबर महिन्यात शोमधून बाहेर झाला अनू मलिक...

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनू मलिक इंडियन आयडॉलच्या दहाव्या पर्वात परीक्षक म्हणून सहभागी झाला होता. पण #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. यात गायिका सोना मोहपात्राने त्याच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. या दोन गायिकांनीही अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यानंतर सोनी वाहिनीने त्यांना ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या पर्वातून परीक्षकपदावरून काढून टाकले होते. पण पुन्हा एकदा तो अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून शोमध्ये झळकला होता. त्यावरुन अनू मलिकला पुन्हा एकदा जोरदार विरोध झाला. सोना, नेहा आणि श्वेता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध दर्शवला. हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेले होते. महिला आयोगाने सोनी वाहिनीला यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. अखेर अनु मलिकने गेल्या महिन्यात शो सोडण्याचा निर्णय घेतला.  

बातम्या आणखी आहेत...