आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंडियन आयडॉल'चा विजेता सनी हिंदुस्तानी म्हणतो - 'इंडियन आयडॉल'मुळे बूट पॉलिश करणारा सेलिब्रिटी झाला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यश गुप्ता, मुंबईः 'इंडियन आयडॉल' च्या सीझन 11 चा विजेता ठरलेला भटिंडा (पंजाब)च्या सनी हिंदुस्तानीने आपल्या विजयानंतर दिव्य मराठीसोबत खास गप्पा मारल्या....

  • ज्यावेळी तू 'इंडियन आयडाॅल' सीझन 11 चा विजेता घोषित झाला त्यावेळी तुला कसे वाटले?

जे प्रत्येक गायकाचे स्वप्न होते, ती प्रतिष्ठित ट्राॅफी मला मिळाली आहे यावर मला विश्वासच बसत नव्हता. 'इंडियन आयडॉल'ला ऑडिशनला आलाे होतो तेव्हाच ठरवले होते की, ही ट्रॉफी माझ्या हातात यावी आणि ज्यावेळी खरोखरच हिला मी हातात घेतले त्यावेळी काही क्षण विश्वासच बसला नाही.

Love you dosto♥️♥️😍😍

A post shared by sunny (@sunny_hindustaniofficial) on

  • ट्रॉफी जिंकल्यावर सर्व परीक्षकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या ?

मी विजेता झाल्यामुळे तीनही परीक्षकांना खूप आनंद झाला होता. 'इंडियन आयडॉल'च्या या प्रवासात नेहा मॅम, विशाल सर आणि हिमेश सरांनी मला खूप पाठिंबा दिला. ऑडिशनपासूनच माझ्यात टॉप 2 पर्यंत मजल मारण्याची क्षमता आहे असा माझ्यातील आत्मविश्वास त्यांनी वाढवला. त्यांच्या या सहकार्यामुळेच मी दर आठवड्यात चांगले परफॉर्म करत राहिलो. या तिघांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवला. मला विश्वासच बसत नाही की, हिमेश सरांनी मला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी साइन केले आहे. यासाठी त्यांचा मी खूप आभारी अाहे. या प्रवासात मी परीक्षक आणि आमचे संगीत गुरू महेश आणि नीरज सरांकडून खूप गोष्टी शिकलो. नीरज आणि महेश सर रोज क्लास घ्यायचे आणि यामध्ये संगीताबाबत शिकवले जायचे. माझ्यासारख्या बूट पॉलिश करणाऱ्या मुलाला या शो ने खूप काही दिले. मी 'इंडियन आयडॉल'चा कायम ऋणी राहील.