आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Is Preparing For Airlift Indian Citizens From China; More Than 500 Indian Students In Wuhan

चीनच्या वुहानहून भारतीयांना एअरलिफ्ट करण्याची तयारी; वुहानमध्ये ५०० पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किती भारतीय अडकले? सरकारला ठाऊक नाही!

बीजिंग- चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरस बळींचा अाकडा ८० वर गेला आहे. २,८४० जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी चीनने वुहान जवळपासच्या १३ शहरांतील लोकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. अद्याप अनेक भारतीय तेथे अडकले असून बहुतांश दक्षिण भारतीय आहेत. 


केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून भारतीय विद्यार्थ्यांना विमानाने मायदेशी आणण्याची मागणी केली आहे. तथापि, तेथील भारतीयांचा आकडा सरकारकडे नाही. दरम्यान, अधिकृत सूत्रांनी सांगितले की, भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी बोइंग ७४७ विमान तयार आहे. एअर इंडियाला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. वुहानमधील विद्यापीठात ५०० पेक्षा जास्त भारतीय शिक्षण घेत आहेत. मात्र कोरोनाचा प्रकोप होण्याआधीच चिनी नववर्षाच्या सुट्यामुळे बहुतांश विद्यार्थी घरी परतलेले आहेत.
संबंधित. 

किती भारतीय अडकले? सरकारला ठाऊक नाही!


कोरोनाचा संसर्ग असलेल्या चीनमधील वुहानमध्ये ५०० पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी आहेत. नूतन वर्षाच्या निमित्ताने सुटी असल्याने बहुतांश विद्यार्थी मायदेशी परतले होते. मात्र ४५ विद्यार्थी बीजिंग येथील राजदूत कार्यालयाच्या संपर्कात आहेत, असे सूत्रांनी सांगितले. एकूण भारतीयांची संख्या स्पष्ट झाली नाही. दुसरीकडे भारतीयांच्या सुटकेसाठी एअरलिफ्ट करण्याची मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. दुसरीकडे वुहानमध्ये प्रवासावर बंदी लागू झाल्यानंतर सुमारे ४.१ कोटींहून जास्त लोक घरात कैद आहेत.


परराष्ट्र मोहिमेवरील भारतीय अधिकारी चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना काढण्यासाठी योजना तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. भारतीय प्रशासनाने ट्विट करून वुहानमध्ये अडकलेल्या लोकांकडून पासपोर्टची माहिती मागवली आहे. पासपोर्टची हार्डकॉपी नसलेले, व्हिसा मुदत वाढवण्याची समस्या, वर्क परमिट इत्यादीमुळे अडकलेल्या लोकांशी संपर्क साधला जात आहे. 


केंद्र सरकारने दिल्लीत एम्स, राम मनोहर लोहिया रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार केला आहे. तेथे गरज भासल्यास तत्काळ व्यवस्था असावी, असा त्यामागील उद्देश आहे. २५ जानेवारी रोजी १३७ उड्डाणांनी सुमारे २९ हजार ७०७ प्रवाशांची स्क्रिनिंग झाली होती. पाच राज्यांना निर्देश : नेपाळजवळील पाच राज्यांत त्यासंबंधीचे निर्देश दिले. यात पश्चिम बंगाल, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार व सिक्किम या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणताही व्यक्ती तपासणीशिवाय भारतात प्रवेश करणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालच्या पानीटंकी व उत्तराखंडच्या पिथोडगड जुआलघाट, जौलजिबीमध्ये स्क्रिनिंग घेतली जात आहे.

चीनने नूतन वर्षाची सुटी २ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे


आधी या सुट्या २४ ते ३० जानेवारी पर्यंत होत्या. सोमवारी पंतप्रधान ली क्विंग देखील वुहानला पोहोचले. हे कोरोना व्हायरसचे केंद्र आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना वुहानमधून बाहेर काढण्यासाठी मंगळवारी सॅन फ्रान्सिस्को येथे विशेष उड्डाणाची तयारी केली. चीन व्यतिरिक्त जगभरात कोरोना व्हायरसची इतर देशांत एकूण ४४ प्रकरणे समोर आली आहेत. थायलंड-७, ऑस्ट्रेलिया-५, जपान, अमेरिका, फ्रान्स व मलेशियात प्रत्येकी तीन प्रकरणे आहेत. त्यामुळे काेरोनाची दहशत आहे. 

८१  जणांचा मृत्य

काेराेना व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा ८१  वर जाऊन पोहोचला आहे. वुहानमध्ये २ ८४० लोकांना त्याची बाधा झाली आहे. देशात २७०० हून जास्त प्रकरणात काेरोना व्हायरसची पुष्टी मिळाली आहे. कोरोनामुळे न्यूमोनियाची प्रकरणे देखील समोर आली आहेत.