आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Kings Palace Where Only Naked People Can Enter Story Of Maharaja Bhupinder Singh

या राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच मिळायची एंट्री, तब्बल 365 होत्या राण्या, रात्रीसाठी अशी करायचा निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या काळात काय-काय नव्हते... आता हे महाराजच घ्या ना. आपल्या रंगेल स्वभावामुळे यांना ओळखले जाते. यांच्याबाबत नेहमीच सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे- यांच्या 'लीला' महालात फक्त विवस्त्र होऊनच प्रवेश मिळायचा. 

 

हे आहेत पतियाळा (पटियाला) संस्थानाचे प्रसिद्ध महाराजा भूपिंदर सिंह. यांच्याबाबत जेवढे जाणून घ्याल, तेवढेच आश्यर्च वाढत जाईल. वास्तविक, महाराजांची काही कृत्येच अशी होती. महाराजा भूपिंदर सिंह यांचे दीवान जरमनी दासने आपले पुस्तक 'महाराजा'मध्ये हा पूर्ण तपशील लिहिलेला आहे. हे वाचल्यावर त्या काळाबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल.

 

महाराजा भूपिंदर सिंहने पतियाळामध्ये 'लीला-भवन' हा रंगेलपणासाठी खास महाल बांधला होता. येथे केवळ निर्वस्त्र व्यक्तींनाच प्रवेश मिळायचा. हा महाल पटियाला शहरात भूपेन्दरनगर जाणाऱ्या रस्त्यावर बाहरदरी बागच्या जवळ बनलेला आहे. या महालाचा उल्लेख त्यांच्या दीवानाने पुस्तकात केलेला आहे.

 

महालाचा एक खास कमरा महाराजांसाठी रिझर्व्ह होता. रूमच्या भिंतीवर चहुकडे बनलेल्या चित्रांवर शेकडो आसनांमध्ये प्रणयाराधनेत बुडालेल्या स्त्री-पुरुषांना दाखवण्यात आलेले आहे. रूमला हिंदुस्तानी रीतीने सजवण्यात आले आहे. फरशीवर मौल्यवान जडजवाहिरीने लगडलेले मोठेमोठे कालीन अंथरलेले आहेत. महाराजांच्या भोग-विलासाचा पूर्ण बंदोबस्त तेथे आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, महाराज भुपिंदर यांचे थक्क करून टाकणारे किस्से... 

 

बातम्या आणखी आहेत...