आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Indian Language Story Telling Platform Pratilipi Raises 15 Million Dollar In Series B Funding

पाच मित्रांनी 5 वर्षांपूर्वी सुरू केले ऑनलाइन गोष्टी लिहिण्याचे काम, आज झाले कामाचे चीज; मिळाले 100 कोटी रूपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर 2014 मध्ये पाच मित्रांनी मिळून हिंदीमध्ये ऑनलाइन गोष्टी लिहिण्याचे सुरु केलेले काम आता इतर लोकांना देखील पसंतीस पडत आहे. वाचक आणि लेखकांची वाढती संख्या पाहता गुरुवारी कंपनीला एकाच फटक्यात 103 कोटी रुपये मिळाले. आम्ही सांगत आहोत ऑनलाइन गोष्टी लिहिणारा प्लॅटफॉर्म प्रतिलिपी.कॉम (pratilipi.com) विषयी. 


या लोकांनी जमा केला फंड
बंगळुरुची ऑनलाइन गोष्टी प्लॅटफॉर्मकडून गुरुवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांनी सीरीज-बी फंडिंग अंतर्गत 15 मिलियन डॉलर अर्थां 103 कोटी रुपये जमवले आहे. प्रतिलिपीनुसार यामध्ये क्यूमिंग व्हेंचर्स पार्टनर्स (Qiming Venture Partners),नेक्सस व्हेंचर्स पार्टनर्स (Nexus Venture Partners), ओमिडयार नेटवर्क इंडिया (Omidyar Network India), कॉन्ट्रेरियन वृद्धि फंड (Contrarian Vriddhi Fund) आणि डब्ल्यूईएच व्हेंचर्स यांनी भाग घेतला होता. कंपनीचे म्हणणे आहे की, आता येत्या 12 ते 18 महिन्यांत तांत्रिक पायाभूत सुविधा, व्यक्तिगत लक्षित इंजनचा विकास ाणि आपल्या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक लेखकांना जोडण्याचे त्यांचे लक्ष आहे.  


2015 मध्ये पहिल्यांदा मिळाले 30 लाख रूपये
माहितीनुसार, प्रतिलिपीची वाढती लोकप्रियता पाहता मार्च 2015 मध्ये पहिल्यांदा 30 लाख रूपयांची फंडिंग मिळाली होती. टी लॅब्स यांनी ही फंडिंग केली होती. यानंतर 2016 मध्ये नेक्सस व्हेंचर्स पार्टनर्स यांनी 6.9 कोटी रूपयांची फंडिंग केली. यानंतर प्रतिलिपीने आपला विस्तार करण्यासाठी फंडिंग गोळा करण्याची योजना आखली. फेब्रुवारी 2018 मध्ये सीरीज-ए राउंडमध्ये प्रतिलिपीला 29 कोटी रूपयांची फंडिंग मिळाली. आता सीरीज-बी मध्ये तब्बल 1.06 कोटी रूपयांची फंडिंग मिळाली आहे. अशाप्रकारे प्रतिलिपीला आतापर्यंत 140 कोटी रूपयांची फंडिंग मिळाली आहे. 


सप्टेंबर 2014 मध्ये प्रतिलिपीची झाली होती सुरुवात

विकिपीडियावरील उपलब्ध माहितीनुसार, प्रतिलिपी या ऑनलाइन गोष्टी प्लॅटफॉर्मची सुरुवात सप्टेंबर 2014 मध्ये झाली. रणजीत प्रताप सिंह, प्रशांत गुप्ता, राहुल रंजन, सहृदयी मोदी आणि शंकरनारायणन देवराजन या पाच मित्रांनी मिळून प्रतिलिपीची सुरूवात केली. भारतीयांना आपल्या भाषेत ऑनलाइन गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रतिलिपीचा उद्देश होता. सुरुवातीला यावर हिंदी आणि गुजराती भाषांतील गोष्टी उपलब्ध होत्या. पण नंतर याचा विस्तार करण्यात आला. आज प्रतिलिपीवर हिंदी, गुजरातीसोबत मराठी, बंगली, कन्नड, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील गोष्टी उपलब्ध आहेत. आज या प्लॅटफॉर्मवर 92 हजारांहून अधिक लेखक आणि 63 लाखांपेक्षा जास्त वाचकवर्ग जोडलेला आहे. प्रतिलिपीला आयआयटी मुंबईकडून बेस्ट बिझनेस आयडियासाठी युरेका पुरस्कार देखील देण्यात आला आहे.