आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला दुबईला घेऊन गेला मुलगा, नंतर नातवाची काळजी घेतली नाही म्हणून पत्नीसोबत मिळून जाळले आईला दिले चटके आणि...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- एक भारतीय व्यक्तीने पत्नीसोबत मिळून आपल्या जन्मदात्या आईवर इतके आत्याचार केले की, त्यात त्यांचा मृत्यू झाला. फॉरेंसिक रिपोर्टमध्ये कळाले की, मृत्यूवेळी त्या महिलेचे वजन फक्त 29 किलो होते. निर्दयी मुलाने आईच्या उजवा डोळाही काढून घेतला होता. सध्या पोलिसांनी दोघांनाही अटक कले आहे. 
 

शेजाऱ्याने दिली पोलिसांना सूचना
त्या दाम्पत्याच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेनेच पोलिसांना त्या वृद्ध महिलेवर आत्याचर होत असल्याची माहिती दिली होती. त्या दाम्पत्याविरूद्ध अल कुसायस पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पण त्या महिलेच्या मुलाने आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

 

शेजाऱ्याने सांगितले की, महिलेच्या मुलाची पत्नी नोकरी करत असल्यामुळे आपल्या लहान मुलांना घरीच सोडून जात असे. ती नेहमी म्हणायची की, तिची सासू भारतातून आली आहे, पण ती मुलांची काळजी घेत नाही.


पहिल्यांदा बालकनीत महिलेला पाहीले
शेजाऱ्याने सांगितले की, एके दिवशी वृद्ध महिला फ्लॅट्चाय बालकनीत पडलेली दिसल्या. त्यांच्या शरीरावर कपडेही नव्हते आणि त्यांचे शरीर अनेक ठिकाणी जळालेले होते. याची माहिती सुरक्षा रक्षकांना देऊन त्यांना रूग्णालयात दाखल केले.

 

रूग्णालयात घेऊन जात असताना त्या वेदनेने व्हिवळत होत्या, त्यांचे शरीर वाईट पद्धतीने जळालेले होते. त्यांचा मुलगा आणि सुन त्यांच्यासोबत अँब्यूलन्समध्येही आले नाही. काही वेळानंतर रुग्णलयातून त्यांना कॉल आल्यावर ते रुग्णालयात गेले. 


डॉक्टरांनी सांगितल्यानुसार महिलेची अनेक हाडे तुटली होती. त्यांना वेगवेगळ्या वस्तुंनी मारले होते. शरीराच्या आत अनेक ठिकाणी रक्त गोठले होते. तसेच त्यांना अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की, जुलै ते ऑक्टोबर 2018 दरम्यान महिलेवर आत्याचार करण्यात आले होते. पण, महिलेच्या मुलाने आरोपांचे खंडन केले आहे.