आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; संमेलनाध्यक्षपद निवडीबाबत अजूनही धुसफूस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षाची निवड केली जात असे. आता एकमताने अध्यक्ष निवडला जातो. सुरुवातीला अनेकांनी या नव्या प्रक्रियेचे समर्थन केले होते. आता या प्रक्रियेमुळे आपली संधी हुकल्याचे जाणवल्याने अनेकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. काही जण उघड उघड बोलताहेत, तर काहींची संमेलनस्थळीही या विषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

अध्यक्षपद निवडतानाही जात अन् पैसा बघतात

मराठवाड्यातलं पहिलं साहित्य संमेलन असेल तर माझ्यासारख्या माणसाची दखल यांना का घ्यावी वाटली नाही. मी देशभर मराठी साहित्यात नाव कमावलं. पण, आता अध्यक्ष निवडण्याची पद्धतीच या लाेकांनी बदलल्याने आमच्यासारखी माणसं अशीच झाकाेळून जाणार. इथं जाती व्यवस्थेचाच विचार करणारी माणसं बसलेली आहेत. पुरस्कार देताना म्हणा की अध्यक्ष म्हणून निवडतानाही जातीलाच महत्त्व दिलं जातं. मग याला साहित्य आणि संमेलन कसं म्हणायचं? याने संस्कृती वाढत नाही, तर सध्या साहित्य संमेलनांमध्ये जे काही सुरू आहे ती शाेकांतिका आहे. - लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक

निवड करणारे लाेक चुकीचे

एकमताने निवड ही प्रक्रिया चांगली आहे, पण ती चुकीच्या हाती आहे. त्याचं स्वरूप बदललं पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिकांच्या कमिटीत काही माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक घेऊन अध्यक्षपदासाठीचा माणूस निवडावा. साहित्य संस्थांचे चालक राजकारण करतात. अनेकांना मग संधी मिळत नाही. सध्याच्या वातावरणात फादर दिब्रिटाेंना अध्यक्षपद दिलं ती बाब अत्यंत चांगली आहे. - किशाेर सानप, साहित्यिक

एकुणातच सगळं अवघडच

मर्यादित मतदार अध्यक्ष निवडणार हा एक मुद्दा हाेता. आता या संस्था ठरवणार. म्हणजे आता ताे आकडा आणखीच खाली आला. उदा. भारत सासणे यांचं नाव घुमानपासून चाललं. पण, ते नाव मागे पडलं. जे लायक आहेत त्यांचा निवड करणारी मंडळी सन्मान करणं शक्यच नाही. त्यामुळे नवीन पद्धती जी आहे, ती सुरुवातील चांगली वाटली. पण, खरं तसं नाहीये ते.
- रवींद्र गुर्जर, साहित्यिक, प्रकाशक
 

बातम्या आणखी आहेत...