आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये सध्या मिळणाऱ्या सर्वात महागड्या कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच लक्झरी ब्रँड बुगातीने गेल्या आठवड्यात जिनिव्हात "ला वॉच्युर नॉर' सादर केली असून ही महागड्या कारची निर्मिती करणाऱ्यांसाठी एक उदाहरण आहे. या कारची किंमत जवळपास १३१.३३ कोटी रुपये आहे. भारतीय बाजारपेठेतील महागड्या कारचा विचार केल्यास हिच्यापुढे सर्व कार खुज्या ठरतील. भारतातील महागड्या कारची माहिती जाणून घेऊया...


१. रोल्स रॉयस फँटम
रोल्स रॉयसचे फँटम फ्लॅगशिप मॉडल आहे. कंपनीच्या आठव्या आवृत्तीची कार भारतात मिळत असून तिची किंमत जवळपास ११.३५ कोटी रुपये आहे. रोल्स रॉयसची "कलिनन' जगातील सर्वात महागडी एसयूव्ही मानली जाते. ही भारतात ७ कोटी रुपयांत मिळत आहे. या कंपनीची "डॉन' भारतात ६.२५ कोटी रुपयांत विकली जात आहे.


२.लॅम्बॉर्गिनी अव्हेंटाडोर एसव्हीजे
जगात केवळ ९०० लॅम्बॉर्गिनी एव्हेंटाडोर एसव्हीजे आहेत. प्रत्येक कारची किंमत ८.६ कोटी रुपयांहून जास्त आहे. यात ६.५ लिटरचे व्ही १२ इंजिन असून ते ७७० एचपीची शक्ती देते. कारला ७२० एनएम टॉर्क निर्माण करते. शून्य तेे १०० पर्यंतचा वेग २.८ सेकंदांत पकडते. लॅम्बॉर्गिनी "एव्हेंटाडोर एस' ५.८९ कोटी रुपयांत मिळत आहे.


३. बेंटली मुजान स्पीड
बेंटलीच्या ओळख असलेली प्रत्येक बाब या कारमध्ये आहे. "मुजान'ची गणना जगातील सर्वात वेगवान अल्ट्रा लग्झरी सेडाॅनमध्ये केली जाते. यात ६.८ लिटरचे व्ही ८ इंजिन असून ते ५२७ एचपीची शक्ती देते तसेच ११०० एनएम टॉर्क निर्माण करते. भारतात याची  किंमत सुमारे ७ कोटी रुपये आहे.


४. फेरारी ८१२ सुपरफास्ट
फेरारीची "८१२ सुपरफास्ट' व "जीटीसी४ लुसो व्ही १२'  भारतात ५.२० कोटी रुपयांत मिळत आहे. "जीटीसी ४ लुसो व्ही १२' मध्ये दोन इंजिनाचे पर्याय आहेत. "८१२ सुपरफास्ट' मध्ये ६.५ लिटरचे व्ही १२ असून ते  ८०० एचपीची शक्ती निर्माण करते. कार १०० चा वेग २.९ सेकंदांत पकडते.

बातम्या आणखी आहेत...