आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Oil, Oil India And Other Government Companies Are Forbidden To Bid For BPCL

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन ऑइल, ऑइल इंडियासह अन्य सरकारी कंपन्यांना बीपीसीएलसाठी बोली लावण्यास मनाई  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन ऑइल कॉर्पाेरेशन(आयईओसी) तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अन्य कंपन्यांना बीपीसीएलमध्ये हिस्सेदारीची खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. बीपीसीएलच्या अधिग्रहणासाठी कोणत्याही खरेदीदाराकडून जवळपास ९०,००० कोटी रु. खर्च करावे लागू शकतात. मंत्रिमंडळाच्या आर्थिक प्रकरणाच्या समितीने बीपीसीएल आणि सर्वात मोठी जहाज बांधणी कंपनी शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया(एससीआय)मध्ये सरकारची हिस्सेदारी विकण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय कंटेनर कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया(सीसीआय)च्या खासगीकरणाचा निर्णयही घेतला आहे. प्रधान यांनी गुरुवारी सांगितले की, २०१४ पासून आमचा असा विचार राहिलेला आहे की, सरकारचे काम व्यवसाय करणे नाही. आमच्याकडे दूरसंचार आणि विमान वाहतूक यासारख्या दोन-तीन क्षेत्रांचे उदाहरण आहे, जिथे खासगी क्षेत्रातील भागीदारीतून ग्राहकांसाठी किमती घटल्या आहेत, शिवाय कार्यक्षमताही वाढली आहे. यासोबत त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. बीपीसीएलसोबत नुमालीगड रिफायनरीही विकली जाणार नाही. 
 

बीपीसीएल खरेदीदारास मिळेल १४% कच्चे तेल शोधण्याची क्षमता

बीपीसीएलचे अधिग्रहण करणाऱ्या खरेदीदारास देशातील १४ टक्के कच्च्या तेलाचा शोध घेण्याची क्षमता आणि इंधन विपणन आराखड्याच्या जवळपास २५ टक्के मिळेल. बीपीसीएलची विक्री त्याच्या पोर्टफोलियोतून नुमालीगड रिफायनरीला काढल्यानंतर केली जाईल. बीपीसीएलच्या समभागाच्या सध्याच्या किमतीनुसार सरकारला ५३.२९ टक्के हिस्सेदारीचे मूल्य ६२,००० कोटी रु. होईल. अधिग्रहण करणाऱ्या कंपनीस अल्पांश समभागधारकांना २६ % अतिरिक्त
हिस्सेदारी घेण्यासाठी ओपन ऑफर घ्यावी लागेल.
 

टीएचडीआयएलची हिस्सेदारी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशकडे

टीएचडीसीआयएलच्या १५२३ मेगावॅटची  इन्स्टॉल्ड कॅपिसिटी आहे. टिहरीत १ हजार मेगावॅट  क्षमता आहे तर कोटेश्वरमध्ये ४०० मेगावॅटची क्षमता आहे. भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकारकडे मध्य इक्विटीचे प्रमाण ७५:२५ आहे.  टीएचडीसीआयएलकडे सध्या ५५३९ मेगावॅट क्षमतेच्या १३ योजना कार्यान्वित/ विकासाच्या विविध टप्प्यात आहेत. १९९८८ मध्ये सुरू केलेल्या टीएचडीसीआयएल सन २००६-०७ मध्ये टिहरी धरण व एचपीपीच्या कमिशनिंगसोबत कायम लाभ देणारी कंपनी आहे.नीपकोकडे  ईशान्य भारतात १२५१ मेगावॅट उत्पादनाची क्षमत

नीपको ईशान्येतील ऊर्जा गरजांची पूर्तता पूर्ण करते. नीपको १२५१ मेगावॅटची संयुक्त स्थापित क्षमतेसोबत ५ जलविद्युत, ३ औष्णिक व १ सौर ऊर्जा केंद्राचे परिचालन करते. नीपकोच्या ५ विद्युत योजना विकासाधीन आहेत. ज्यात ११० मेगावॅट, पारे जलविद्युत योजना, ६०० मेगावॅट, कामेंग जल विद्युत योजना, ३६ मेगावॅट, स्टिम टर्बाइन,  त्रिपुरा गॅस आधारित योजना, ६० मेगावॅट, तुरियल योजना. १९७६ मध्ये सुरू झालेल्या कंपनीत १,९८३ कर्मचारी आहेत.बातम्या आणखी आहेत...