आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात बनणार जगातली सर्वात उंच रेल्वेमार्ग, भुयारात असेल रेल्वे स्थानक, चिनी सीमेपर्यंत जाणार मजल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात पहिल्यांदाच भुयारी रेल्वेस्थानक बांधण्यात येणार आहे. चीन सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय रेल्वेने नवी दिल्ली आणि लडाख प्रदेशादरम्यान रेल्वे लाईन बसविण्याचे योजना बनवली आहे. हे रेल्वे स्थानक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. बिलासपुर-मनाली-लेह लाइन हिमाचल प्रदेशच्या चीन सीमेजवळच्या समुद्राच्या सपाटीपासून 5,360 मीटरच्या उंचीवर, तर 30 किलोमीटर आत असेल. दिल्लीमधील आणि इतर महानगरांतील मेट्रो रेल्वे प्रकल्पातील अनेक स्थानके भुयारी आहेत, परंतु मुख्य रेल्वे मार्गावर केलांग हे देशातील पहिले भुयारी रेल्वे स्थानक असेल. या रेल्वेमार्गासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

 

>  उत्तर रेल्वेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी. आर. गुप्ता म्हणाले की, भुयारात रेल्वे स्थानक बनवता येऊ शकते, त्याचबरोबर या मार्गात इतर स्थानक पण बनवता येतील, सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यात माहिती स्पष्ट होईल. 
>  मनालीच्या उत्तरेकडे 26 कि.मी. अंतरावर केलोंग, लाहौल आणि स्पीती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. जेथून तिबेटची सीमा 120 कि.मी. दूर आहे.
>  उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक चौबे म्हणाले की या रेल्वेमार्गावर 74 सुरुंगा, 124 मोठे पुल आणि 396 लहान पुल बांधावे लागतील. त्याचबरोबर या रेल्वे लाइन वर 30 स्टेशन असतील. यामुळे दिल्लीचे अंतर 40 तासांवरुन 20 तासांवर येईल.

 

जगातली सर्वात उंच रेल्वे मार्ग
>  या रेल्वेमार्गाची उंची समुद्रसपाटीपासून 5,360 मीटर असेल. सध्या चीनमधील तिबेटमध्ये असलेल्या रेल्वे लाइनची उंची सर्वाधिक आहे. ती समुद्रसपाटीपासून 2,000 मीटर आहे. 465 किमीच्या या मार्गाच्या बांधकामसाठी सुमारे 83,360 कोटी रुपये लागले आहेत.

>  2022 पर्यंत हा प्रकल्प पुर्ण करण्याकडे रेल्वेचे लक्ष आहे. पण हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी, भारतीय रेल्वेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...