आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Railways Has Announced That No Charges Will Be Levied On Relief Material Sent To The Flood Affected States

पूरग्रस्तांच्या मदतीला जाणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही - पियुष गोयल यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - सध्या राज्यासह देशभरात पुराने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांसह, कर्नाटक, केरळ आणि गुजरात या राज्यांनाही पुराचा तडाखा बसला आहे. या लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर शेकडो जणांचे प्राण गेले आहेत. या पुरग्रस्तांसाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे सरसावत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि मदतीचे साहित्य पुरवण्यासाठी जाणाऱ्यांकडून रेल्वे प्रशासन कोणतेही शुक्ल आकारणार नसल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. 
 

जास्तीत जास्त मदत करण्याची गोयल यांची विनंती
महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगलीसह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्येही पूराने थैमान घातले आहे. यामुळे येथील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. या पूरग्रस्त भागासाठी देशभरातून मदत करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मदत करणाऱ्या संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तींसाठी भारतीय रेल्वेनेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि मदतीचे साहित्य पुरवण्यासाठी जाणाऱ्यांकडून रेल्वे प्रशासन कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबतच्या आदेशाचे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. तसेच, देशभरातील लोकांनी अधिक प्रमाणात पूरग्रस्त भागांना मदत करावी, अशी विनंती गोयल यांनी केली आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही मोफत सेवा सुरू राहणार असून पुढील परिस्थीती पाहून तारीख वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...