आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे लवकरच सुरू करणार पॉड हॉटेल, स्टेशनच्या बाहेर थांबण्यासाठी मिळतील लग्झरी रुम; टिव्ही, वायफायसह असतील सर्वप्रकारच्या सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 'IRCTC' लवकरच प्रवाशांसाठी पॉड हॉटेलची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे हॉटेल मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ असणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, प्रवाशांना या हॉटेलमध्ये कमी पैशांत चांगल्या सुविधा मिळणार आहे.

 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली ही माहिती
'IRCTC'चे कॉर्पोरेट सेल्स मॅनेजर पिनाकीन मोरवाला यांनी सांगितले की, रेल्वे विविध ठिकाणी जवळपास 30 पॉड कॅप्सूल हॉटेल उभारणार आहे. त्यासाठी वेस्टर्न रेल्वेकडे प्रस्ताव पाठवला असून त्यांच्या परवानगीच्या वाट पाहत असल्याची माहिती त्यांनी दिली. परवानगी मिळताच हॉटेल पॉड्सची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पॉड्समध्ये मिळतील याप्रकारच्या सुविधा
हे पॉड्स वातानुकूलित असतील. त्यात लाइट कंट्रोल, वायफाय, मनोरंजनासीठी टिव्ही, इंटरकॉम, पर्सनल लाकर्स, पॉवर सॉकेट, USB पोर्टसारख्या अनेक सुविधा असणार आहे.

 

असे असतील पॉड्स
> प्रत्येक पॉड्सची लांबी 7 फूट.
> प्रवासी 7 ते 8 तास या पॉड्समध्ये आराम करु शकतात.
> तसेच प्रवाशांसाठी डायनिंगची सुविधा, वॉशरूम, चेंजिंगरूम यासारख्या सुविधाही असतील.

 

 

बातम्या आणखी आहेत...