Home | Business | Industries | indian retail market have need fdi

किरकोळ व्यापारातही थेट परकीय गुंतवणूकीला परवानगी द्या- सूचना मंत्रालयाची शिफारस

agency | Update - May 28, 2011, 04:06 PM IST

जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी 'मल्टि ब्रॅण्ड रिटेल' व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी, अशी सूचना आंतर मंत्रालय गटाने केंद्र सरकारला केली आहे.

  • indian retail market have need fdi

    जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी 'मल्टि ब्रॅण्ड रिटेल' व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी, अशी सूचना आंतर मंत्रालय गटाने केंद्र सरकारला केली असल्याची माहिती इंटर मिनिस्टिरियल ग्रुपचे (आयएमजी) अध्यक्ष व अर्थ मंत्रालयाचे मुख्य आथिर्क सल्लागार कौशिक बसू यांनी पत्रकारांना दिली.

    धान्याचा शेतातून बाहेर पडतानाचा विक्री भाव आणि ग्राहकाला बाजारात धान्याची किरकोळ खरेदी करतानाचा भाव यातील तफावत कमी करण्यासाठी शेतीमाल विक्रीबाबतचे कायदे सुधारण्याची गरज आहे. आयएमजीची स्थापना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी २०१०मध्ये केली होती. 'मल्टि ब्रॅण्ड रिटेल'मध्ये टप्प्याटप्प्याने थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणणे हा महागाईवरचा उपाय होऊ शकतो, असे 'आयएमजी'ने काढलेल्या निष्कर्षात दिसून येत असल्याचे बसू यांनी सांगितले.

Trending