National / भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केले ब्लॅक गोल्ड, हे सौर ऊर्जेला बूस्ट आणि समुद्राच्या पाण्याला पिण्यालायक बनवते

दिव्य मराठी

Jul 17,2019 05:27:00 PM IST

मुंबई- टाटा इंस्टीट्यूट्स ऑफ फंडामेंटल रिसर्च(टीआयएफआर)च्या शास्त्रज्ञांनी सोन्यापासूनच ब्लॅक गोल्ड नावाचा नवीन धातू तयार केला आहे. हा धातू सौर उर्जेला बूस्ट करणे आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याला पिण्यालायक बनवण्याचे काम करते. शास्त्रज्ञांनी प्रयोगासाठी सिलिकाचा वापर केला. याच्या काही भागावर ब्लॅक गोल्डला पेंट केले, काही वेळेनंतर सिलिकाचे तापमान 38 डिग्री वाढले.

ब्लॅक गोल्डमुळे पेंट केलेल्या भागाचे तापमान 67 वरून 88 डिग्रीपर्यंत गेले. तापमानात झालेली वाढतच सौर ऊर्जेला बूस्ट करण्यात मदत मिळते. या प्रकारेच ब्लॅक गोल्डचा वापर नॅनो हीटरसाठी करता येतो. यामुळे पाण्याची वाफ करण्यास मदत मिळते, ज्यामुळे समुद्रातील पाणी पिण्यालायक बनवले जाऊ शकते.


असे तयार केले
टीआयएफआरच्या रिसर्च टीमला लीड करत असलेले शास्त्रज्ञ विवेक पोलशेट्टीवर म्हणाले, आम्ही सोन्याच्या नॅनोपार्टिकलला दुसऱ्या कोणत्या पार्टिकल्ससोबत मिसळले नाहीये. सोन्याच्या नॅनोपार्टिकल्सच्या अंतरांना वेगळे केले. त्यानंतर डेंड्राइटिक फाइब्रोस नॅनोसिलिकाच्या मदतीने नवीन मटेरिअल तयार केले. याला ब्लॅक गोल्ड नाव दिले.


काय आहे खासियत
ब्लॅक गोल्ड मटेरिअलचे विशेषता म्हणजे हे कार्बन डायऑक्साइडला शोषून घेते, पण हा गुण सोन्यात नसतो. ब्लॅक गोल्ड प्रकाशासोबत सुर्याच्या रेडीएशनलाही ऑब्जर्व करतो.

X