आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- भारतात स्मार्टफोन बाजारात २०१८ मध्ये १४.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्षभरात एकूण १४.२३ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली. ही माहिती संशोधन संस्था आयडीसीच्या अहवालात समोर आली आहे. २०१७ मध्ये भारतात एकूण १२.४३ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली होती. श्याओमी २०१८ मध्ये भारतात अव्वल क्रमांकाचा स्मार्टफोन ब्रँड राहिला. या कंपनीची बाजार भागीदारी २८.९ टक्के राहिली. २२.४ टक्के शेअरसह सॅमसंग दुसऱ्या आणि १० टक्के शेअरसह विवो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
डिसेंबर तिमाहीमध्ये स्मार्टफोनची विक्री १९.५ टक्क्यांनी वाढली आहे. या तिमाहीमध्ये ३.६३ कोटी हँडसेट विक्री झाले. २०१७ च्या डिसेंबर तिमाहीमध्ये ३.०३ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली होती. दिवाळीनंतरही ई-कॉमर्स कंपन्यांनी डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सेल ठेवले होते. यामुळे २०१८ च्या डिसेंबर तिमाहीमध्ये २०१७ च्या तुलनेमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत तेजी आली. वास्तविक २०१८ च्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेमध्ये डिसेंबर तिमाहीमधील विक्री १५.१ टक्क्यांनी कमी झाली आहे.
आयडीसी इंडियाच्या संशोधन व्यवस्थापक उपासना जोशी यांनी सांगितले की, या वर्षी ऑनलाइन चॅनलच्या माध्यमातून स्मार्टफोनची विक्री आतापर्यंतची सर्वाधिक ३८.४ टक्के राहिली, हेच २०१८ चे वैशिष्ट्य ठरले आहे. तर २०१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये हा आकडा ४२.२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
स्मार्टफोनची सरासरी किंमत ११,१७९ रुपये
- २०१८ मध्ये भारतात विक्री झालेल्या स्मार्टफोनची सरासरी किंमत ११,१७९ रुपये (१५८ डॉलर) राहिली. अर्ध्यापेक्षा जास्त स्मार्टफोन १०० ते २०० डॉलरच्या दरम्यानचे विक्री झाले.
- प्रीमियम श्रेणीमध्ये ४३.९% वाढ नोंदवण्यात आली. वास्तविक, एकंदरीत स्मार्टफोन बाजारात प्रीमियम श्रेणीची भागीदारी केवळ ३% आहे.
वन प्लस ३५,००० ते ५०,००० रुपयांच्या रेंजमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ब्रँड राहिला.
- सुपर प्रीमियम श्रेणीमध्ये सॅमसंगने अॅपल सोडल्यास सर्वांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सॅमसंगने हे यश गॅलेक्सी एस-९ च्या यशामुळे मिळवले.
- भारतात सध्या स्मार्टफोनपेक्षा जास्त फीचर फोनची विक्री होत आहे. सर्व प्रकारच्या मोबाइल फोनचा विचार केल्यास ५६ टक्के विक्री फीचर फोनची आहे. २०१८ मध्ये एकूण १८.१३ कोटी फीचर फोनची विक्री झाली. २०१७ च्या तुलनेत ही १०.६% जास्त आहे.
- फीचर फोनमध्ये सर्वाधिक ३६.१% भागीदारी जिओ फोनची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.