आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची सुवर्णकन्या; हिमा दासने अवघ्या 20 दिवसांत केली 5 व्या सुवर्ण पदकाची कमाई, 400 मीटर हर्डल्समध्ये जाबिरलाही सुवर्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- भारतीय रनर हिमा दासने शनिवारी आणखी एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या महिन्यात तिचे हे 5वे सुवर्ण पदक आहे. चेक रिपब्लिकमध्ये झालेल्या नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रां प्रीमध्ये हिमाने 400 मीटर रेस 52.09 सेकंदात पूर्ण केली. हा तिचा आतापर्यंतचा बेस्ट टाईम आहे. तर, 400 मीटर हर्डल्समध्ये एमपी जाबिरनेही सुवर्णाची कामगिरी केली. तसेच मोहम्मद अनसने ब्रॉन्ज मेडल आणि निर्मल टॉमने सिल्वर जिंकले.

 

19 वर्षीय हिमाने ही रेस दुसऱ्यांदा कमी वेळेत पूर्ण केली आहे. या आधी तिची सर्वोकृष्ठ वेळ 50.79 सेकंदाची आहे, जी तिने मागीव वर्षी आशिया खेळात केली होती. पाचवे सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तिने ट्वीट करत म्हणाली, "चेक गणराज्यात 400 मीटर रेसमध्ये अवल्ल स्थानी राहून रेस पूर्ण केली."


हिमाने याप्रकारे जिंकले मागील चार सुवर्ण
 

पहिले गोल्ड: 2 जुलैला हिमाने पोजनान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये 200 मीटर रेसमध्ये भाग घेतला होता. तिने ती रेश 23.65 सेकंदात पूर्ण करुन सुवर्ण पदक नावाव केले.
दुसरे गोल्ड: 7 जुलैला पोलंडमध्ये कुटनो अॅथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटर रेसला 23.97 सेकंदात पूर्ण करुन गोल्डची कमाई केली.
तिसरे गोल्ड: 13 जुलैला चेक रिपब्लिकमध्ये झालेल्या क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या 200 मीटर रेसला 23.43 सेकंदात पूर्ण केले.
चौथे गोल्ड: 17 जुलैलाच चेक रिपब्लिकमध्ये ताबोर अॅथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटर रेस अवघ्या 23.25 सेकंदात पूर्ण केली.

बातम्या आणखी आहेत...