आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रियम गर्गकडे कर्णधारपदाची धुरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियम गर्ग आणि राहुल द्रविड - Divya Marathi
प्रियम गर्ग आणि राहुल द्रविड
  • 17 जानेवारीपासून साउथ आफ्रीकेत 16 संघात विश्वचषकाची स्पर्धा
  • भारताने आतापर्यंत चार वेळेस अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे
  • या विश्वचषकात भारत ग्रुप-एमध्ये तर पाकिस्तान ग्रुप-सीमध्ये आहे

स्पोर्ट डेस्क- बीसीसीआयने अंडर-19 विश्वचषकासाठी आज(सोमवार) 15 जणांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रियम गर्गकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर विकेटकीपर ध्रुव चंद जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यावेळसचा विश्वचषक दक्षिण आफ्रीकेत 17 जानेवारीपासून सुरू होईल तर अंतिम सामना 9 फेब्रुवारील खेळला जाईल. भारताचा पहिला सामना श्रीलंकेसोबत 19 जानेवारीला आहे.चार वेळेस अंडर-19 विश्वचषक आपल्या नावावर केलेला भारतीय संघ ग्रुप-एमध्ये आहे तर पाकिस्तानी संघ ग्रुप-सीमध्ये आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेसोबत, दुसरा सामना जापान आणि तिसरा न्यूजीलँडसोबत आहे. यावेळेस एकूण 16 संघाने विश्वचषकात भाग घेतला आहे.भारतीय संघ- प्रियम गर्ग (कर्णघार), ध्रुव चंद जुरेल (यष्टिरक्षक आण उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सुशांत मिश्र, विद्याधर पाटिल.
चार ग्रुपमधील संघ

ग्रुप-एग्रुप-बीग्रुप-सीग्रुप-डी
भारतऑस्ट्रेलियापाकिस्तानअफगानिस्तान
श्रीलंकाइंग्लँडबांग्लादेशदक्षिण आफ्रीका
न्यूजीलँडवेस्टइंडीजजिम्बाब्वेयूएई
जापाननायजीरियास्कॉटलँडकॅनडा

प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ सुपर लीगमध्ये जातील
 
एकूण चार ग्रुप आहेत. प्रत्येग ग्रुपमध्ये चार संघ आहेत. प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ सुपर लीगमध्ये जातील. वॉर्म अप सामना 12 ते 15 जानेवारीदरम्यान जोहांसबर्ग आणि प्रिटोरियामध्ये खेळले जातील. चार शहर आणि आठ मैदानांवर 24 सामने खेळले जातील. भारताने आतापर्यंत 4, ऑस्ट्रेलियाने 3, पाकिस्तानने 2 आणि इंग्लँड, वेस्ट इंडीज आणि साउथ आफ्रीकेने 1-1 वेळेस विश्वचषक जिंकला आहे.