आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- विराट कोहलीने आज(सोमवार) मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, भारतीय संघाकडे जगात कुठेही ,कोणत्याही संघाशी आणि कोणत्याही फॉर्मेटमध्ये खेळण्याची क्षमता आहे. मग तो पांढरा चेंडू असो, लाल चेंडू असो किंवा गुलाबी चेंडू असो. भारतीय संघ 14 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सीरीज खेळेल. पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल.
कोहलीने डे-नाइट टेस्टबद्दलही एक वक्तव्य केले. कोहली म्हणाला की, "आम्ही भारतात डे-नाइट कसोटी खेळली आहे. ज्याप्रमाणे ही कसोटी झाली, त्यावरुन आम्ही आनंदी आहोत. हे कोणत्याही कसोटी सामन्याची विशेषता बनली आहे. आम्ही डे-नाइट कसोटी आणि कोणत्याही सामन्यासाठी तयार आहोत."
भारताने मागच्या आठवड्यात श्रीलंकेला हरवले
भारताने मागच्याच आठवड्यात श्रीलंकेसोबत तीन सामन्यांची टी-20 सीरीज खेळली. त्यात भारताने श्रीलंकेला 2-0 ने हरवले होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडेही चांगला संघ आहे. एका वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध वन-डे सीरिज खेळली होती. ऑस्ट्रेलियाने भारताला 3-2 ने हरवले होते.
दोन्ही संघ
भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केदार जाधव, मनीष पांडेय, ऋषभ पंत (विकेटकीपर), लोकेश राहुल, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर आमि कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलिया- एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कैरी (विकेटकीपर), पॅट कमिंस, एश्टन एगर, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, मॉर्नस लबुशाने, केन रिचर्डसन, डी आर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, एश्टन टर्नर, डेविड वॉर्नर आणि एडम जम्पा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.