आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय टेनिसपटू उणे 10 अंश तापमानात पाकविरुद्ध झंुजणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : भारत अाणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषकातील सामन्याच्या अायाेजनाचा मार्ग अाता सुकर झाला अाहे. कारण, या सामन्याच्या अायाेजनाचे त्रयस्थ ठिकाण अाता निश्चित झाले अाहे. अाता भारत अाणि पाक यांच्यातील दाेनदिवसीय सामना कझाकिस्तानची राजधाspoनी असलेल्या नूर सुलतान शहरात रंगणार अाहे. भारतीय टेनिसपटू २९ व ३० नाेव्हेंबर राेजी या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत हा सामना खेळणार अाहेत. या ठिकाणचे तापमान उणे १० असल्याची माहिती देण्यात अाली अाहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीमध्ये भारताचे टेनिसपटू विजयासाठी झंुजताना दिसणार अाहेत. या थंडीमुळे येथील इनडाेेअर हाॅलमध्ये या सामन्याचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या दाेन्ही देशांच्या या सामन्याचे अायाेजन सुरुवातीला पाकच्या इस्लामाबाद येथे हाेणार हाेते. मात्र, या ठिकाणाला भारतीय संघातील खेळाडूंनी प्रचंड विराेध केला हाेता. त्यामुळे अाता ठिकाणात बदल झाला.

रशिया संघाकडून गत चॅम्पियन क्राेएशियाचा ३-० ने पराभव


डेव्हिस कप फायनल्समध्ये रशियाच्या टीमने सनसनाटी विजयाची नाेंद केली. टीमने मंगळवारी माद्रिद येथे अायाेजित सामन्यात गत चॅम्पियन क्राेएशियाला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. रशिया संघाने ३-० ने एकतर्फी विजय नाेंदवला. सुमार खेळीमुळे क्राेएशियाच्या टीमचा लाजिरवाणा पराभव झाला.