Inspirational / अशा 'बेटी'ला सलाम! वडिलांच्या निधनानंतरही देशासाठी हॉकी खेळून फायनल जिंकून देणारी लालरेमसियामी भारतात परतली

वडिलांच्या निधनाच्या दोन दिवसानंतर जपानमध्ये झाला होता सामना

दिव्य मराठी वेब

Jun 26,2019 10:51:00 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय महिला हॉकी टीमने रविवारी वुमन्स सिरीज फायनल्समध्ये विजय मिळवला. याच विजयातील खरी हिरो लालरेमसियामी आता भारतात परतली आहे. फायनल सामना होणार त्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी लालरेसियामीचे वडील लालथनसंगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तरीही भारताची ही हॉकीटपटू मोठ्या धाडसाने देशासाठी खेळली. केवळ खेळलीच नाही, तर जपानला 3-1 ने पराभूत देखील केले. मायदेशी परतताच तिने आईला मिठी मारली आणि मन भरून रडली.


पंतप्रधानांनी दिल्या होत्या शुभेच्छा
लालरेमसियामी मिझोरमच्या कोलासिब जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती मंगळवारी जपानहून भारतात परतली. लालरेमसियामी गावात येताच आपल्या वडिलांनी श्रद्धांजली दिली. या गावात स्थानिकांनी तिचे हिरोसारखे स्वागत केले. परंतु, आईला पाहताच तिला भावना आवरल्या नाही. टूर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताकडून पहिली गोल कॅप्टन रामपालने तिसऱ्याच मिनिटाला केला होता. याव्यतिरिक्त गुरजीत कौरने दोन गोल केले. तत्पूर्वी भारतीय महिला टीमने सेमिफायनलमध्ये चिलीला 4-2 ने पराभूत करून ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली होती. भारताच्या या विजयावर पंतप्रधान मोदींनी देखील ट्वीट करून शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी लालरेमसियामीच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले होते.

X
COMMENT