आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Women Cricket Team Member Mithali Raj Annnounces Retirement From T20 International Cricket

महिला क्रिकेट / मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून घेतला संन्यास, सर्वाधिक धावा करणारी भारतीय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स न्यूज - भारताची स्टार क्रिकेटर मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजने मंगळवारी यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली. मितालीने सांगितले, की "2006 पासून टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व केल्यानंतर या फॉरमॅटमधून संन्यास घेत आहे. त्यामुळे, मला 2021 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या तयारीवर लक्ष केंद्रीत करता येईल." टी-20 च्या 89 सामन्यांत मितालीने सर्वाधिक 2364 धावा काढल्या आहेत.

मिताली पुढे म्हणाली, "देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अजुनही अपुरे आहे. मी यात जास्तीत-जास्त चांगली कामगिरी करू इच्छिते. नेहमीच मला सहकार्य केल्याबद्दल बीसीसीआयचे आभार... दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणाऱ्या पुढच्या मालिकेसाठी भारतीय टी-20 टीमला माझ्याकडून शुभेच्छा..."
 

बातम्या आणखी आहेत...