आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत 19 टक्के कमी पगार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - भारतातील कार्यालयांमध्ये लिंगभेद म्हणजेच पुरुष आणि महिलांमधील भेदभाव अद्यापही खूपच जास्त आहे. रोजगार वेबसाइट मॉन्स्टरच्या अहवालानुसार महिलांना एक समान कामासाठी पुरुषांच्या तुलनेमध्ये १९ टक्के कमी पगार मिळतो. हा अहवाल २०१८ च्या आकडेवारीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. २०१७ मध्ये हा फरक २० टक्के होता. म्हणजेच एका वर्षात यामध्ये केवळ एक टक्क्यांची घट झाली आहे.  पुरुषांना महिलांच्या तुलनेमध्ये प्रतितास काम करण्यासाठी ४६.१९ रुपये जास्त मिळतात. पुरुषांना प्रतितास सरासरी २४२.४९ रुपये पगार आहे. महिलांना १९६.३ रुपये मिळतात. पगाराबाबत सर्वाधिक फरक आयटी क्षेत्रात आहे. 


या क्षेत्रात पुरुषांना महिलांच्या तुलनेत २६ टक्के जास्त पगार मिळतो. उत्पादन क्षेत्रातील पुरुषांना महिलांच्या तुलनेमध्ये २४ टक्के जास्त पैसे मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे आराेग्य सेवा क्षेत्रात आणि सामाजिक कार्यांशी संबंधित नोकऱ्यांमध्येही पुरुषांना महिलांच्या तुलनेमध्ये २१ टक्के जास्त पगार मिळतो. बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात मात्र हा फरक अत्यंत कमी आहे. येथील फरक केवळ दोन टक्के आहे. माॅन्सटरडॉटकॉमचे सीईओ (एशिया पॅसिफिक) अभिजित मुखर्जी यांनी सांगितले, वर्षभरात लिंग फरकामध्ये केवळ एक टक्का घट झाली असून हे चिंताजनक आहे.

बातम्या आणखी आहेत...