आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबुधाबीत एका भारतीयाने जिंकला 19 कोटींचा जॅकपाॅट, विजेत्यांच्या यादीत सहा भारतीयांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबु धाबी - संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) रविवारी एका भारतीयाने लॉटरीत एक कोटी दिरहमचा (सुमारे १९ कोटी रुपये) जॅकपॉट जिंकला आहे. वृत्तानुसार, प्रशांत पंडरथिल याने ४ जानेवारीस ऑनलाइन तिकीट विकत घेतले होते.  


विजेत्यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली. आणखी एक भारतीय कुलदीप कुमार याने १ लाख दिरहमची दुसरी लॉटरीही जिंकली. विजेत्यांच्या दहा प्रथम क्रमांकांच्या यादीत सहा भारतीयांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी अभिषेक काथेल या भारतीयाने दुबईतील ड्यूटी फ्री लॉटरीत दहा डॉलरची (७ कोटी ८ लाख रुपये) रक्कम जिंकली होती. अन्य एका लकी ड्रॉमध्ये दुबईच्या सरथ पुरुषोत्तम यांना अबुधाबी इंटरनॅशनल विमानतळावर १.५ कोटी दिरहमचा विजेता घोषित केले होते. 

बातम्या आणखी आहेत...