आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आठपेक्षा अधिक देशांमध्ये कसाेटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सिडनी - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दाैऱ्यात यजमान ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसाेटी मालिका विजय मिळवला. भारताला ७२ वर्षांनंतर हा इतिहास रचता अाला. यासह ऑस्ट्रेलियावर कसाेटी मालिका विजय संपादन करणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला. तसेच आठ वा त्यापेक्षा अधिक देशांत जाऊन कसाेटी मालिका विजयाची नाेंद करणारा भारत हा आशियाईतील पहिला संघ ठरला आहे.तसेच अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चाैथा संघ ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि इंग्लंडने असा पराक्रम गाजवला आहे. तसेच काेहलीच्या नेतृत्वात भारताने विदेश दाैऱ्यात ११ वी कसाेटी जिंकली. यासह त्याने माजी कर्णधार गांगुलीच्या विक्रमाची बराेबरी साधली. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चाैथी कसाेटी पावसाच्या व्यत्ययामुळे साेमवारी ड्राॅ झाली. त्यामुळे भारताने ही चार कसाेटी सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. भारताने सात दशकांनंतर हे माेठे यश संपादन केले आहे. येत्या १२ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. 


दाेन सामने जिंकूनही पतौडींनी गमावली मालिका 
टीम इंडियाने आता दाैऱ्यातील चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत दाेन विजयांची नाेंद केली. यातील एका कसाेटी पराभवाचा सामना केला. तर, एक कसाेटी अनिर्णीत राहिली. असेच १९७८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात यश मिळवले हाेते. मात्र, भारताचा या पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-३ ने पराभव झाला हाेता. पतौडी यांच्या नेतृत्वात टीमने हा दाैरा केला हाेता. 


शियाबाहेर ११ वा कसाेटी मालिका विजय 

भारताने आता प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये कसाेटी मालिका विजय मिळवला आहे. आशियाबाहेर टीम इंडियाचा हा ११ वा कसाेटी मालिका विजय आहे. भारताने विंडीजमध्ये चार, इंग्लंडमध्ये तीन, न्यूझीलंडमध्ये दाेन व झिम्बाव्वेत एक कसाेटी मालिका जिंकली हाेती. याशिवाय भारताने पाक, श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही कसाेटी मालिका विजयाची नाेंद केली अाहे. आतापर्यंत भारताला केवळ आफ्रिकेविरुद्ध कसाेटी मालिका विजय मिळवता आलेला नाही. 


१९८३ च्या वर्ल्डकपसारखा ठरला मालिका विजय : शास्त्री 

आस्ट्रेलियावरच्या कसाेटी मालिका विजयाने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. क्रिकेटची सर्वात माेठी उंची गाठल्याचेही भारतीय संघाने दाखवून दिले. त्यामुळे हा मालिका विजय १९८३ च्या वर्ल्डकप जिंकल्यासारखाच अाहे, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दाैऱ्यात चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला. मालिकेतील चाैथी अाणि शेवटची कसाेटी अनिर्णीत राहिली. विराट काेहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऐतिहासिक यश संपादन करता आले. त्यामुळे ७२ वर्षांनंतर भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा यजमानांविरुद्ध कसाेटी मालिका विजय संपादन करता आला. 


माझ्या करिअरमधील सर्वात माेठा विजय : काेहली 
आस्ट्रेलियाविरुद्धचा कसाेटी मालिका विजय हा माझ्या अायुष्यातील सर्वात अविस्मरणीय असा क्षण आहे. हा माझ्या करिअरमधील सर्वात माेठा विजय आहे.हा w अभिमानाची बाब आ, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट काेहलीने दिली. 


सिडनीत धुरा; ऐतिहासिक विजय 
विराट काेहलीकडे ६ जानेवारी २०१५ रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी कसाेटीदरम्यान भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली हाेती. या नव्या नेतृत्वात त्याने शतक ठाेकून ही कसाेटी ड्राॅ केली हाेती. त्यानंतर आता त्याने याच सिडनीच्या मैदानावर पहिल्यांदा कसाेटी मालिका विजयाची नाेंद केली. या मालिकेत आता ताे २८२ धावाच काढू शकला. तसेच काेहली हा २०१५ च्या मालिकेत ६९२ धावा काढल्या हाेत्या. 


असा मिळवला विजय.. 

फलंदाजी: चेतेश्वर पुजारासह ऋषभ पंत व काेहलीने केली अव्वल खेळी. 
विदेश दाैऱ्यात काेहलीच्या नेतृत्वात ११ कसाेटीत विजय; गांगुलीच्या विक्रमाची बराेबरी 
अजित वाडेकरांच्या नेतृत्वात भारताने विदेशात दाेन संघांविरुद्ध मालिका जिंकली 

 

टीम वर्ष मालिका कर्णधार 
न्यूझीलंड १९६८ ३-१ नवाब पतौडी 
विंडीज १९७१ १-० अजित वाडेकर 
इंग्लंड १९७१ १-० अजित वाडेकर 
झिम्बाव्वे २००५ १-० साैरभ गांगुली 
ऑस्ट्रेलिया २०१९ २-१ विराट काेहली 


ता पहिला शियाई कर्णधार 
जगातील नंबर वन फलंदाज असलेल्या विराट काेहलीने आता भारताला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसाेटी मालिका विजय मिळवून दिला. असे यश संपादन करणारा विराट काेहली हा पहिला अाशियाई आणि भारतीय कर्णधार ठरला. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात मालिका विजयासाठी आशियातील २९ कर्णधारांनी आपले काैशल्य पणास लावले. यात भारताच्या १२ कर्णधारांचा समावेश आहे. मात्र, यापैकी काेणालाही हा पल्ला गाठता आला नाही. त्यानंतर आता काेहलीने मालिका विजयाचा पराक्रम गाजवला. 


२९ कर्णधार, ११ भारतीय कॅप्टनही अपयशी 
बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर कसाेटी मालिकेत पराभूत करण्यासाठी आशियातील चार संघांच्या २९ कर्णधारांनी जिवाचे रान केले. मात्र, यजमानांनी आपल्या हाेमग्राउंडवर मालिकेत पराभव पत्करला नाही. आता काेहलीने ऐतिहासिक कामगिरीतून या सिरीज पराभवाची मालिका खंडित केली. त्यामुळे आशियातील २९ कर्णधारांनंतर काेहली हा एकमेव कर्णधार ठरला, ज्याच्या नेतृत्वात आशियाई टीमला ऑस्ट्रेलियावर कसाेटी मालिका विजयाची नाेंद करता आली. यात भारताच्या ११ कर्णधारांचाही समावेश आहे. 


आशियाई कसाेटी संघांची आतापर्यंतची ऑस्ट्रेलियामधील कामगिरी 
भारतीय संघ : १२ कसाेटी मालिका, ८ मध्ये पराभव, १ कसाेटी मालिका जिंकली 
पाकिस्तान : १२ कसाेटी मालिका, ०९ गमावल्या, कधीही मालिका विजय नाही 
श्रीलंका : ०६ कसाेटी मालिका, सहाही मालिकेत पराभव 
बांगलादेश : १ कसाेटी मालिका, या मालिकेत पराभव 
१३६ वर्षानंतर अाॅस्ट्रेलियाचे मालिकेत एकही शतक नाही 


मान्यवरांकडून काैतुकाचा वर्षाव 
७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसाेटी मालिका विजयाची नाेंद करणाऱ्या भारतीय संघावर आता मान्यवरांकडून काैतुकाचा वर्षाव हाेत आहे. यात राष्ट्रपती काेविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे. या सर्वांनी टीमचे अभिनंदन केले. 

 

भारत ठरला पाचवा संघ

ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर कसाेटी मालिकेत पराभव करण्याचा पराक्रम चार टीमच्या नावे हाेता. मात्र, आता भारतीय संघाने स्थान मिळवले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियामध्ये कसाेटी मालिका विजय संपादन करणारा भारत हा पाचवा संघ ठरला. त्यामुळे भारताने आता इंग्लंड, आफ्रिका, विंडीज व न्यूझीलंडनंतर पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले. 

 

बातम्या आणखी आहेत...