आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजरंगने मिळवून दिले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता- पहिलवान बजरंग पुनिया याने आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करत १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ६५ किलो वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारात बजरंगने अंतिम लढतीत जपानच्या दाइची ताकातानीचा ११-८ अशा फरकाने पराभव केला. बजरंगचे आशियाई स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण आहे. बजरंगने चार वर्षांपूर्वी इंचियोन आशियाई स्पर्धेत ६१ किलो वजनगटात रौप्य पटकावले होते. दरम्यान, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफल मिक्स्ड प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. 


सुवर्णपदकाचा दिला शब्द
बजरंगने या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी म्हटले होते की, ‘माझे गुरू योगेश्वर यांनी २८ वर्षांनंतर देशाला कुस्तीचे सुवर्णपदक मिळवून दिले होते. मी पण आता फार वाट पाहायला लावणार नाही.’


पराभव धक्कादायक
भारताचे पाच फ्रीस्टाइल पहिलवान पहिल्या दिवशी ५७,६५, ७४, ८६ आणि ९७ िकलो वजनगटात उतरले. सुशीलकुमार उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या सुशीलचा पराभव धक्कादायक ठरला.


नेमबाजी: अपूर्वी-रवीने मिळवून दिले पहिले पदक 
अपुर्वी चंदेला अाणि रवी कुमारने पहिल्या दिवशी भारताला पदकाने सुरुवात करून दिली. त्यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक पटकावले. त्यांनी ४२९.९ गुणांसह तिसऱ्या स्थानी धडक मारली. 


मनु-अभिषेकची निराशा
राष्ट्रकुल चॅम्पियन नेमबाज मनू भाकरने  सर्वांची निराशा केली. तिला मिश्र सांघिक गटात  सहकारी अभिषेक वर्मासाेबत पात्रता फेरीत अपयशाला सामाेरे जावे लागले. ही जाेडी १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र गटाची पात्रता पूर्ण करू शकली नाही.


कबड्डी : भारतीय पुरुष संघाने उडवला विजयाचा डबल धमाका   
सात वेळच्या एशियन चॅम्पियन भारतीय पुरुष कबड्डी संघाने अाठव्या किताबाच्या माेहिमेचा  श्रीगणेशा करताना विजयाचा डबल धमाका उडवला.  भारताने सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. भारताने अ गटातील पहिल्या सामन्यात ५०-२१ अशा फरकाने एकतर्फी विजय नाेंदवला. त्यानंतर भारताने श्रीलंकेवर ४४-२८ ने मात केली.  १९९० पासून भारतीय संघाने अातापर्यंत सात सुवर्णपदकांची कमाई केली अाहे. अाता अाठव्यांदा चॅम्पियन हाेण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली. यातून भारताने स्पर्धेत  बांगलादेशला पराभूत केले. भारताने दाेन्ही हाफमध्ये अाक्रमक खेळी करताना  पकड अधिक मजबूत केली. 


कबड्डी : भारतीय महिलांचा जपानवर  ४३-१२ ने मिळवला विजय   
किताबाची हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने यंदा भारतीय महिला संघ स्पर्धेत सहभागी झाला अाहे. यासाठी भारतीय महिलांनी सलामीला शानदार विजय नाेंदवला. भारताच्या महिलांनी सलामीला जपानवर मात केली. भारताने ४३-१२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह भारतीय महिलांनी अापल्या गटात विजयाचे खाते सहज उघडता अाले. अाता हीच लय कायम ठेवण्याचा महिला संघाचा प्रयत्न असेल. सलामीला चांगली सुरुवात करताना भारतीय महिलांनी पहिल्या हाफमध्ये ११ गुणांनी अाघाडी घेतली हाेती.त्यामुळे ७-१८ ने पिछाडीवर पडलेल्या जपानची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर भारताने सरस खेळी करताना हा सामना अापल्या नावे केला.


बॅडमिंटन : सायना, सिंधू काेर्टवर उतरणार; अाज जपान संघाचे अाव्हान  
माजी नंबर वन सायना नेहवाल अाणि रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू अापल्या माेहिमेला सुरुवात करण्यासाठी अाज साेमवारी बॅडमिंटनच्या काेर्टवर उतरणार अाहे. भारतीय महिलांचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना बलाढ्य जपानशी हाेणार अाहे. त्यामुळे भारताला विजयासाठी माेठी कसरत करावी लागेल. यासाठी सायना व सिंधूच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.  


श्रीकांतच्या नेतृत्वात भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत  
के. श्रीकांतच्या कुशल नेतृत्वात भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने स्पर्धेतील किताबाच्या अापल्या माेहिमेला शानदार सुरुवात केली. भारताने अंतिम १६ च्या सामन्यात मालदीव टीमविरुद्ध एकतर्फी विजय नाेंदवला. भारताने ३-० ने  पहिल्या फेरीतील सामना जिंकला. यासह भारतीय संघाला थेट अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. या विजयाने भारताला गत स्पर्धेतील अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावता अाला. काेरियाने भारताचा पराभव केला हाेता. अाता भारतीय संघाला उपांत्यपूर्व सामन्यात यजमान इंडाेनेशियाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे.  


जलतरण : साजन प्रकाश पाचव्या, नटराज सातव्या स्थानावर   
भारताचा अनुभवी जलतरणपटू साजन प्रकाशचे पदक जिंकण्याचे स्वप्न स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भंगले. त्याला पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने फायनलमध्ये १ मिनिट ५७.७५ सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. यासह ताे पाचव्या स्थानी राहिला. त्याचे काही सेकंदाने कांस्यपदक हुकले. दुसरीकडे नटराजला सातवे स्थान गाठता अाले. त्याचाही पदकाचा प्रयत्न अपुरा ठरला. या गटात चीनच्या खेळाडूने सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच जपान अाणि काेरियाला अनुक्रमे राैप्य व कांस्यपदकाची कमाई करता अाली.   


व्हाॅलीबाॅल : भारतीय महिला संघाचा पराभव; काेेरियाचा ६३ मिनिटांत विजय
भारतीय महिला व्हाॅलीबाॅल संघाला स्पर्धेच्या ब गटातील पहिल्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. सलामीला काेरियाने सरस खेळी करताना भारतीय महिलांना पराभूत केले. काेरियाने ६३ मिनिटांत २५-१७, २५-११, २५-१३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह टीमने विजयी सलामी दिली. दरम्यान, भारतीय संघाला समाधानकारक खेळी करता अाली नाही.  


टेनिस : दिविज- कमरानने दिली ८१ मिनिटांत विजयी सलामी   
युवा टेनिसस्टार दिविज शरणने एशियन गेम्सच्या पहिल्याच दिवशी भारताला टेनिसमधील पदकांच्या माेहिमेला दमदार सुरुवात करून दिली. त्याने  अापली सहकारी कमरान थंडीसाेबत मिश्र दुहेरी गटात विजयी सलामी दिली. भारताच्या या जाेडीने सलामीच्या सामन्यात फिलिपाइन्सच्या अल्बर्टाे-जेड मारियनचा पराभव केला. त्यांनी ६-४, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह भारताच्या जाेेडीला १ तास २१ मिनिटांत या गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित करता अाला. या जाेडीने दाेन्ही सेटवर अाक्रमक खेळी करताना सहज विजय साकारला. यासह त्यांना विजयी सलामी देता अाली. अाता हीच लय कायम ठेवताना अंतिम फेरीचा पल्ला गाठण्याचा मानस िदविजने विजयानंतर व्यक्त केला. 


बास्केटबाॅल : भारतीय महिलांचा दुसरा पराभव; द. काेरियाचे अाव्हान  
भारतीय महिला बास्केटबाॅल संघाचा माेहिमेला दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला. संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. अ गटातील दुसऱ्या सामन्यात चीन-तैपेईने सरस खेळी करताना भारतीय महिलांना पराभूत केले. या संघाने ८४-६१ अशा फरकाने सामना जिंकला. यामुळे  भारतीय महिलांना अपयशाला सामाेरे जावे लागले.  या सामन्यातील विजयाचा भारतीय महिलांचा प्रयत्न अपुरा ठरला. भारताकडून संगीता काैरने ११, जिना सकारियाने १२ अाणि रसप्रीतने १२ गुणांची कमाई केली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही.  अाता भारतीय महिलांचा पराभवाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी टीमला अाज साेमवारी संयुक्त काेरियाच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल.


कुस्ती : पवनची झंुज ठरली अपयशी; दाेन मिनिटांत हसनचा विजय
भारताच्या अाघाडीचा मल्ल पवनला पहिल्याच दिवशी अापल्या ८६ किलाे वजन गटात सुमार खेळीचा फटका बसला. यामुळे त्याला धूळ चाखावी लागली. वर्ल्ड चॅम्पियन, अाॅलिम्पिक अाणि अाशियाई चॅम्पियन हसन याजदानीचारातीने अापला दबदबा कायम ठेवताना भारताच्या  पवनला चीतपट केले. त्याने ११-० अशा फरकाने ही कुस्ती जिंकली. त्याने अवघ्या दाेन मिनिटांत विजय संपादन केला. यासह त्याने पुढची फेरी गाठली. दरम्यान, विजयासाठी पवनने दिलेली झंुज सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे त्याचे अागेकूचचे स्वप्प भंगले. त्याला या लढतीत प्रत्युत्तराची संधीच मिळाली नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...