आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 टक्के भारतीय कामगारांना सुट्टीच्या समस्या; हॉलिडे एंजॉय असला तरी एंजॉय करण्यात मागे, नेहमीच नोकरी गमावण्याची भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - सुटी घेण्याच्या बाबतीत भारतीय जगात सर्वात पिछाडीवर आहेत. ट्रॅव्हेल वेबसाइट एक्सपीडियाने जारी केलेल्या 2018 च्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे. देशात 75 टक्के लोक सुट्टीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. भारतानंतर 72 टक्यांवर दक्षिण कोरिया आणि 69 टक्यांवर हाँग-काँग हे देश आहेत.

 

>> भारतातील कर्मचारी सुटी मिळाल्यानंतरही त्यांचा पूर्णपणे उपभोग घेत नाहीत. भारतासह या देशांमध्ये जपान, इटली, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगितले आहे, कामावर लक्ष दिले नाही तर नोकरी गमावण्याची भीती भारतीय कर्मचाऱ्यांना सर्वाधिक आहे. अशात सुटी मिळाल्यानंतरही ते एंजॉय करू शकत नाहीत. 

>> एका सर्वेक्षणात असेही सांगितले आहे, की 18 टक्के लोकांचे लोक सुट्टीच घेत नाहीत. 64 टक्के लोक या कारणामुळे सुट्या घेत नाहीत की, सुट्यानंतर त्यांच्यावर कामाचा अधिक दबाव पडेल. तर 17 टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात एकही सुट्टी घेतली नाही. 55 टक्के लोकांना सुटी घेतल्यावर कामाचा ताण वाढतो असे वाटते.

बातम्या आणखी आहेत...