आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीत राहणारा मुलगा ठरला \'इंडियाज् गॉट टॅलेंट\'चा विजेता, मॅजिकच्या जोरावर जिंकले 25 लाख, आता ऑटो ड्रायव्हर वडिलांसाठी खरेदी करणार घर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रियलिटी शोमध्ये मॅजिशियन जावेद खान विजेता ठरला आहे. जावेदला ट्रॉफीसोबत 25,00,000 रुपये बक्षिस म्हणून मिळाले आहे. यासोबतच मारुती सुजुकी कारही दिली आहे. सिरोही, राजस्थान येथे राहणारा जावेद मुंबई येथील मलाड(पूर्व)च्या पठानवाडी चाळीत एका छोट्याश्या रुममध्ये राहतो. कठीण परिस्थितींचा सामना करुन येथे पोहोचलेल्या जावेदने आपले हुनर, काम, कुटूंबाविषयी आमच्या वेबसाइटशी बातचित केली. 

 

जावेदचा कॉलेजमध्ये मोडला होता साखरपूडा 
- जावेद सांगतो, "हा शो जिंकणे म्हणजे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. मी राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड, वासडामधून आलो आहे, त्यांच्यासाठीही ही अभिमानाची गोष्ट आहे. मला नाही वाटत की, येणा-या काळात एवढे नाव कुणी करु शकेल."
- पर्सनल लाइफविषयी जावेद म्हणतो की, "पाचवीत असताना माझा साखरपुडा झाला होता. पण कॉलेजच्या काळात साखरपुडा मोडला. होणा-या सासरच्या लोकांना मी सांगितले होते की, मी तीन-चार वर्षांनंतर लग्न करेल. कारण मला स्थायी जॉब आणि घर हवे होते. वडीलही रिक्षा चालवतात, त्यांचीही परिस्थिती सुधारायची होती. पण मुलीच्या घरच्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांना वाटले की, मी कारण सांगतोय."
- "माझ्या सासरच्या लोकांनी खुप अफवा पसरवल्या. मुंबईमध्ये माझे दुस-याच एका मुलीसोबत लग्न झाले आहे असे ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या घरच्यांवर खुप प्रेशर आले. माझ्या पालकांचाही माझ्यावरचा विश्वास उडाला. ते माझे काहीच ऐकायचे नाही. पालक पुन्हा गावी गेले. मी एकटा मुंबईत राहून डिप्रेशनमध्ये गेलो."
- "ही चार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. पण येथूनच एक आशेचा किरण जागा झाला आणि माझ्या छंदावर काही करण्याचा विचार माझ्या मनात आला. नंतर इंटरनेटवर सर्च करुन मॅजिक करणे शिकलो. स्वतः मेथड बनवल्या, इंजीनियरिंगचे नॉलेज टाकले आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळू लागला."
- "मी स्वतःला सिध्द केल्यानंतर, त्या मुलीचे नातेवाईकही मला सपोर्ट करु लागले. तिचे सख्खे मामा माझ्या सपोर्टमध्ये आले. त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न माझ्या बहिणीसोबत केले. ते मुलीला नेहमी म्हणायचे की, त्यावेळी मुलाचे ऐकले असते, तर सर्व ठिक झाले असते. मुलगा चुकीचा नव्हता."
- आता माझ्या आई-वडिलांनाही माझा अभिमान आहे. त्यांच्यासाठी हे खुप मोठे यश आहे. 

10 हजार रुपयांची नोकरी करायचा जावेद आता पालकांसाठी घेणार घर 
- जावेदने सांगितले की, "सर्वात पहिले तो आपल्या पालकांचे आयुष्य सुधारणार आहे. तो त्यांच्यासाठी घर खरेदी करणार आहे. यासोबतच त्याचे मॅजिक पुढे घेऊन जाईल. याला काही तरी वेगळे बनवेल."
- "मुंबई येथील अंधेरीमध्ये आयटीचे जॉबही करत राहिले. येथे चारवर्षांपासून जॉब करतोय. त्यांचा पुर्ण सपोर्ट आहे. मला घरातूनही कामाची सुट आहे. सुरुवातीला मला 10 हजार रुपये येथे मिळायचे आता 23 हजार मिळतात."

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...