shopping / दरवर्षी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जुन्या साहित्याची खरेदी करतात भारतीय; सेकंड हँड अर्थव्यवस्थेत वाढ

सेकंड हँड साहित्याची विक्री वाढण्याची प्रमुख कारणे

विनोद यादव

Aug 26,2019 09:35:00 AM IST

मुंबई - अलीकडेच सेकंड हँड साहित्य खरेदी-विक्री करणाऱ्या ओएलएक्स अॅपवर प्रथमच एमजी हेक्टर कार विक्रीस आली. विशेष म्हणजे नवी गाडी उपलब्ध नसल्याने तिच्या मूळ किमतीपेक्षा जास्त ३ लाख रुपये देऊन ती मागण्यात आली. हे तर एक उदाहरण आहे, सेकंड हँड्सबद्दलचे वेड देशात वाढत आहे. सध्या देशात सेकंड हँड मार्केट वार्षिक ५% या दराने वाढत आहे.


भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाचे (असोचेम) उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, सध्या देशात सेकंड हँड साहित्याचा संघटित बाजार १ लाख २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत अनौपचारिक मानला जाणारा हा बाजार देशात औपचारिक होण्याच्या दिशेने वेगाने वाढत आहे. फ्लिपकार्टच्या युज्ड गुड प्लॅटफॉर्म ‘२’ गुडचे प्रमुख चाणक्य गुप्ता यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस आणि फर्निचर या दोन प्रकारांतील साहित्याच्या विक्रीत दर तिमाहीत २०% वाढ दिसत आहे.


दिल्ली आणि बंगळुरूत असते सर्वाधिक मागणी : अॅमेझॉन इंडियाचे सेलर सर्व्हिसेसचे संचालक विवेक सोमारेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये फेरनवीनीकरण केलेल्या उत्पादनांची जास्त मागणी असते. अॅमेझॉन इंडियावर आलेल्या एकूण ऑर्डरपैकी ७०% ऑर्डर टिअर-२ आणि टिअर-३ शहरातील असतात. अॅमेझॉनवर स्मार्टफोन, लॅपटॉप आणि हेडफोन यांसारख्या रिफर्बिश्ड साहित्याची मागणी जास्त असते. क्विकरनुसारही दिल्लीत सर्वाधिक लोक रि-युज्ड साहित्य खरेदी करण्यास येतात. त्यानंतर बंगळुरू आणि हैदराबादच्या लोकांचा क्रमांक लागतो. तेथील ४१% लोक रि-युज्ड साहित्य खरेदी करत आहेत.


दोन मोठ्या प्लॅटफॉर्मवर दरमहा येताहेत ८ कोटी लोक : ओएलएक्सच्या मते, आमच्या प्लॅटफॉर्मवर दरमहा सुमारे ५ कोटी लोक येतात. त्यात कार प्रवर्गात एक कोटी म्हणजे सुमारे २०% लोक व्हिजिट करतात. ओेएलएक्सनुसार सेकंड हँड कारची मागणी १५% वाढली आहे. क्विकरवर दरमहा ३ कोटी लोक व्हिजिट करतात. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

सेकंड हँड साहित्याची विक्री वाढण्याची प्रमुख कारणे
> वापरलेल्या साहित्याची किंमत ओएलएक्स आणि क्विकरसारख्या प्लॅटफॉर्मवर ३० ते ६०% पर्यंत कमी असते.

> ऑनलाइन कंपन्या युज्ड आणि रिफर्बिश्ड साहित्याच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या शंका डोअरस्टेप, अॅश्युअर्ड सर्व्हिसेस आणि वॉरंटीच्या माध्यमातून दूर करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी राहिल्या.
> ऑनलाइन कंपन्या सेकंड हँड किंवा रिफर्बिश्ड साहित्यावरही गॅरंटी देत आहेत. } टी-२ आणि टी-३ शहरांच्या लोकांच्या मागणीची अचूक माहिती असणे आणि त्यानुसार रिफर्बिश्ड साहित्य मागणीनुसार सहजपणे उपलब्ध करणे.
> सुरक्षित ट्रान्झॅक्शन मोडचा वापर वाढणे आणि जुने साहित्यही हप्त्यांत मिळणे.

X
COMMENT