आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सेलिब्रिटी; एका वर्षात विराटचे उत्पन्न दुपटीहून अधिक वाढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फोर्ब्जने बुधवारी भारतातील १०० सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. अभिनेता सलमान खान सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी ठरला आहे. १ ऑक्टोबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान सलमानने चित्रपट प्रदर्शन, टीव्ही शो आणि जाहिरातीतून जवळपास २५३.२५ कोटी कमावले. 

 

यादीत दुसऱ्या स्थानी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याचे उत्पन्न एका वर्षात दुपटीपेक्षा अधिक वाढले. २०१७ मध्ये विराटची कमाई १००.७२ कोटी होती. तो तिसऱ्या स्थानी होता. या वर्षी त्याची कमाई २२८.०९ कोटी झाली असून त्याने दुसऱ्या स्थानी जागा मिळवली. विराटने शाहरुख खानला पछाडत दुसरे स्थान पटकावले. संपत्तीच्या बाबतीत शाहरुख जगातील दुसरा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. २०१२ पासून जाहीर होत असलेल्या फोर्ब्जच्या १०० भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तो कधीच टॉप-३ च्या बाहेर पडला नव्हता. परंतु यंदा तो टॉप-१० मध्येही नाही. मागील वर्षी १७० कोटी कमाई करणाऱ्या शाहरुखने या वर्षी ५६ कोटींची कमाई केली. तो यंदा १३ व्या स्थानी आहे. 

 

महेंद्रसिंह धोनीची कमाई ६३ कोटींहून वाढून १०१ कोटींवर पोहोचली. तो पाचव्या स्थानी आहे. निवृत्तीच्या ५ वर्षांनंतरही सचिन तेंडुलकर ८० कोटींच्या कमाईसह टॉप-१० मध्ये होता. दुसरीकडे दीपिका पदुकोणची कमाई (११२ कोटी) पती रणवीर सिंह (८४ कोटी) पेक्षा जास्त आहे. १०० सेलिब्रिटींचे एकूण उत्पन्न ३,१४० कोटी रुपये आहे. मागील वर्षी हा आकडा २,६८३ कोटींवर होता. 

 

यादीत ४६ कलाकार, २१ खेळाडू व ७ दिग्दर्शक 
सलमान खान 253.25 कोटी रु. 
विराट कोहली 228.09 कोटी रु. 
अक्षय कुमार 185 कोटी रु. 

- मागील वर्षी रणवीर सिंहची कमाई (६२ कोटी) दीपिका पदुकोणपेक्षा (५९ कोटी) जास्त होती. यावर्षी रणवीर मागे आहे. 
- अक्षय कुमारचे मागील वर्षीचे उत्पन्न जवळपास ९८ कोटी होते. यावर्षी प्रचंड वाढ झाली असून हा अाकडा १८५ कोटींवर गेला. 
- आलिया भट्ट आणि ए.आर. रहमानही कमाईच्या बाबतीत शाहरुखच्या पुढे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...