आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा 20 वर्षांनंतर अमेरिकेवर 5-1 ने विजय; ओव्हरऑल पाचव्यांदा मात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर : भारतीय महिला हॉकी संघाने अापल्या घरच्या मैदानावर साजेशी खेळी करताना अमेरिकेविरुद्ध शानदार विजयाची नाेंद केली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने अाॅलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेवर ५-१ ने मात केली. यासह भारताने अमेरिकेविरुद्ध अापली पराभवाची मालिका खंडित केली. तसेच २० वर्षांनंतर भारताच्या महिला संघाने माेठ्या गाेलच्या फरकाने अमेरिकेचा धुव्वा उडवला अाहे. यापूर्वी भारताने १९९९ मध्ये इन्व्हिटेशनल स्पर्धेत अमेरिकेवर ५-१ ने मात केली हाेती.


अाता भारताच्या विजयात गुरजित काैरने दाेन गाेलचे याेगदान दिले. अव्वल कामगिरी करणारी भारताची कर्णधार राणी रामपाल सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. भारताचा अाेव्हरअाॅल अमेरिकेवरचा पाचवा विजय ठरला अाहे.
गुरजित कौरने केले दाेन गाेल, कर्णधार राणी रामपाल सामनावीर

भारताला सात पेनल्टी कॉर्नरची संधी; तीनवर केले गाेल
भारतीय संघाकडून ४० व्या मिनिटाला काॅर्नरवर शर्मिला देवीने शानदार गाेलची नाेंद केली. त्यानंतर अवघ्या दाेन मिनिटांमध्ये पुन्हा एकदा पेनल्टी काॅर्नरची भारताला संधी मिळाली हाेती. याच संधीला सार्थकी लावताना गुरजित काैरने शानदार गाेल केला. त्यानंतर चार मिनिटांमध्ये नवनीत काैरने फील्ड गाेल केला. ५१ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्राेकवर गुरजित काैरने गाेल केला. यासह भारताने ५-० ने अापला विजय निश्चित केला. ५४ व्या मिनिटाला अमेरिकेने सामन्यात पहिला गाेल केला.

भारताकडून तिसऱ्या व चाैथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी २ गाेल नाेंद

दाेन्ही सामन्यांनंतर बराेबरीचा स्काेअर; तर शूटआऊटमध्ये निकाल
भारतीय संघाने पहिला सामना ४ गाेलच्या अंतराने जिंकला अाहे. अाता दुसरा सामना ३-० ने जिंकल्यासह भारतीय महिला संघ अाॅलिम्पिकसाठी पात्र ठरेल. मात्र गाेलचा स्काेअर बराेबरीत राहिला, तर सामन्याचा निकाल शूटआऊटमध्ये लागणार अाहे. भारताच्या संघावर सर्वांची नजर लागली अाहे.

रशियाविरुद्ध भारताचा सलग सहावा विजय
भारताचा पुरुष हाॅकी संघाने शुक्रवारी पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रशियावर मात केली. भारताने ४-२ ने सामना जिंकला. यासह भारताने रशियावर सलग सहाव्या विजयाची नाेंद केली. हरमनप्रीत (५ वा मि.), मनदीप (२४, ५३ वा मि.) अाणि सुनीलने (६० वा मि.) संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले अाहे.
 

बातम्या आणखी आहेत...