आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या सेटवर मलाइका अरोरा पैठणी आणि नथ बघून भारावली!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या डान्स रिअॅरिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये देशभरातील उत्कृष्ट प्रतिभा सादर होत आहेत. त्यापैकी कोण पुढील फेरीत जाणार हे ठरवणे परीक्षकांसाठी अवघड होत आहे. या वीकेण्डला टेलिव्हिजनवरील सर्वात मोठी व सर्वात कठीण नृत्य-लढत सादर होणार आहे. ही स्पर्धा अधिकाधिक चुरशीची होत चालली आहे, नृत्याच्या या लढतीतून या शोचे बेस्ट बारा – सर्वोत्कृष्ट 12 डान्सर मिळतील, जे पुढे जातील आणि इंडियाज बेस्ट डान्सर या प्रतिष्ठित किताबासाठी एकमेकांशी चढाओढ करतील. 


ऑडिशनच्या भागात आपण पाहिले होते की, नृत्य आणि विशेषतः लावणी या लोकनृत्य प्रकारात पारंगत असलेल्या ऋतुजा जुन्नरकरला साथ देत असल्याबद्दल परीक्षकांनी ऋतुजाच्या आई-वडिलांचे खूप कौतुक केले आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता म्हणून ऋतुजाच्या आईवडिलांनी पुण्याहून खास मलाइकासाठी एक सुंदर पैठणी आणि नथ आणली होती. 


पैठणी आणि नथ पाहून मलाइका खूप भारावून गेली आणि नथ तर तिने लगेच घातली व ती पैठणी आपल्या खांद्यावर ठेवून आपली सह-परीक्षक गीताला दाखवली. जी घातल्यावर ती अगदी मराठमोळी मुलगी दिसत होती. मलाइका म्हणाली, “मला या पैठणीचा गुलाबी रंग आणि नथ खूपच आवडली. मी यापूर्वी पैठणी आणि नथ कधीच परिधान केलेला नाही, पण मला तो परिधान करायला नक्कीच आवडेल. या सुंदर भेटवस्तूबद्दल मी ऋतुजा आणि तिच्या आईवडिलांची आभारी आहे. या शोच्या एखाद्या आगामी भागात मी हा पोशाख नक्की घालून येईन, असे मी त्यांना वचन दिले आहे.”


मलाइकाकडे बघत गीता कपूर चटकन म्हणाली, की मलाइकाला भारतीय पोशाख आणि आभूषणे शोभून दिसतील आणि ऋतुजा म्हणाली की, “मी मलाइका मॅमला पाश्चात्य पोषाखातच पाहिले आहे, त्यामुळे मी आणि माझ्या आईने तिला काही तरी नवीन आणि पारंपरिक भेटवस्तू देण्याचे ठरवले. त्याच वेळी आम्हाला पैठणी साडीची कल्पना सुचली.”
 

बातम्या आणखी आहेत...