आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती आल्टो, ह्युंदाई, न्यु सेंट्रो नाही तर ही कार बनली भारतातील सर्वात जास्त विकणारी कार; जाणून घ्या कारची किंमत आणि फीचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क- सोसायटी ऑफ इंडियान ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)ने 2018 मध्ये सर्वात जास्त संख्येने विकल्या जाणाऱ्या कारची लिस्ट जाहीर केली आहे. त्यापैकी टॉप-10 मध्ये मारुती कंपनीच्या सात कार तर ह्युंदाई कंपनीच्या 3 कार आहे. त्यापैकी सर्वात टॉपला मारुती डिझायर ही कार आहे. 'SIAM'ने एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत जाहीर केलेल्या लीस्टनुसार जवळपास 1,82,139 डिझायर कार विकल्या गेल्या आहे. दिल्लीच्या एक्सशोरुममध्ये या कारची किंमत जवळपास 5.60 लाख रुपये आहे.


डिझायर कारचे इंजिन आणि मायलेज
या कारचे दोन व्हेरिएंट आहे. त्यापैकी पेट्रोल व्हेरिएंट 1.2 लीटर आणि डिझेल व्हेरिएंट 1.3 लीटरचे इंजिन आहे. दोन्ही कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्स देण्यात आले आहे. आता या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन गेअरबॉक्सदेखील उपलब्ध झाला आहे. कंपनीने दावा केल्यानुसार पेट्रोल व्हेरिएंट कार 22 किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज आणि डिझेल व्हेरिएंट 28.4 किलोमीटरचे मायलेज देते.

 

कारचे फीचर्स
डिझायरमध्ये 2 ब्लुटूथ स्पीकर स्टेरिओ सिस्टिम असून त्याशिवाय कारमध्ये रिवर्स पार्किंग सेंसर, फ्रंट पावर विंडोज, व्हील कवर आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टिमसारखे फीचर्स देण्यात आले आहे. या कारच्या स्पेशल एडिशनमध्ये नवीन डॅशबोर्ड, आरामदायक सीट, ड्युएर पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलसारखे  अतीरिक्त फीचर्स आहे.

 

बातम्या आणखी आहेत...