आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुवनेश्वर - भारताने हॉकी विश्वचषकात विजयासह सुरुवात केली. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-० गोलने पराभूत केले. भारताचा दक्षिण आफ्रिकेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने ब्रिस्बेनमध्ये (१९९६)ऑस्ट्रेलिया कप आणि नवी दिल्लीमध्ये (२०१२) झालेल्या सामन्यात द. आफ्रिकेला ४-० ने मात दिली होती. भारताने विश्वचषकात आठव्यांदा सलामीचा सामना जिंकला आहे. भारत आणि आफ्रिकन चॅम्पियन टीममधील विश्वचषकातील पाचवा सामना होता. त्याने द. आफ्रिकेला दुसऱ्यांदा हरवले. तीन सामने बरोबरीत राहिले.
भारताकडून मनदीप सिंगने १० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. आकाशदीप सिंगने १२ व्या मिनिटाला गोल करत भारताला २-० ने आघाडीवर नेले. सिमरनजित सिंगने ४३ व्या आणि ४६ व्या मिनिटाला शानदार गोल केले. ललित उपाध्यायने ४५ व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवून दिला. आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण ४३ सामने झाले आहेत. भारतीय टीमचा हा एकूण २६ वा विजय ठरला आहे.
बेल्जियमचा कॅनडावर ठरला पहिला विजय
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमने पुरुष हॉकी विश्वचषकात पहिल्यांदा कॅनडाला २-१ पराभूत केले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला फेलिक्स डिनायरने गोल केेला. त्यानंतर कर्णधार थॉमस ब्रेल्सने २२ व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल केला. दुसरीकडे कॅनडाच्या मार्क पिअर्सनने ४८ व्या मि. एकमेव गोल केला.
ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना-स्पेन सामना आज
ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील सामन्याला गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपासून सुरुवात होईल. अर्जेंटिनाची टीम आतापर्यंत एकदाही चॅम्पियन बनली नाही. दुसरीकडे स्पेन दोन वेळा उपविजेता राहिला आहे. दोन्ही संघांत विश्वचषकात आतापर्यंत सात सामने झाले. यात स्पेनने ३ आणि अर्जेंटिनाने २ विजय मिळवले. इतर दोन सामने बरोबरीत राहिले. अर्जेंटिना जगातील दुसऱ्या क्रमांकाची टीम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.