आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India's Biggest Win In Four Years, Today India And New Zealand's Fourth Match At Wellington

भारताचे 4 वर्षांतील दाैऱ्यात सर्वाधिक विजय नाेंद, आज भारत व न्यूझीलंड यांच्यातील चाैथा सामना वेलिंग्टनच्या मैदानावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन : मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता यजमान न्यूझीलंडचा सुपडा साफ करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू उत्सुक आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील चाैथा टी-२० सामना आज वेलिंग्टनच्या मैदानावर रंगणार आहे. भारताने सलग तीन सामने जिंकून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. पराभवामुळे यजमान न्यूझीलंडचा संघही अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आगामी वनडे आणि कसाेटी मालिकेपूर्वीच आता ही पराभवाची मालिका खंडित करण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. मालिका विजयाने भारताच्या खेळाडूंचा सर्वाेत्तम खेळीसाठी आत्मविश्वास दुणावलेला आहे.

भारतीय संघ दाैऱ्यात यशस्वी


क्रिकेटच्या टी-२० च्या छाेट्या फाॅरमॅटमध्ये भारतीय संघ अत्यंत यशस्वी मानला जाताे. भारताच्या संघाने ३० जानेवारी २०१६ पासून ३० जानेवारी २०२० पर्यंत टी-२० मध्ये अव्वल कामगिरी नाेंदवली अाहे. भारताने सर्वाधिक २८ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे न्यूझीलंड संघ यात आपल्या घरच्या मैदानावर सर्वात अयपशी संघ मानला जाताे.

सहा फूट, आठ इंच जेमिसन न्यूझीलंड संघात

यजमान न्यूझीलंडने गुरुवारी भारताविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आपली टीम जाहीर केली आहे. या मालिकेसाठी संघात आता सहा फूट आणि आठ इंच उंचीच्या वेगवान गाेलंदाज काइल जेमिसनची निवड झाली. याशिवाय संघात स्काॅट कुगलेजिन, हामिश बेनेटला सहभागी करण्यात आले. दुखापतीमुळे वेगवान गाेलंदाज बाेल्ट, फर्ग्युसन व हेन्रीला वगळण्यात आले.