मेघालय : देशातील / मेघालय : देशातील सर्वात स्वच्छ नदी उमनगोत, बोट भासते काचेवर उभारल्यासारखी 

दिव्य मराठी स्पेशल

Jan 21,2019 01:33:00 PM IST
शिलाँग| हे छायाचित्र पूर्वेचा स्कॉटलंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयातील उमनगोत नदीची आहे. देशातील सर्वात स्वच्छ नदीचा बहुमान तिला मिळाला. पात्र एवढे निर्मळ की नौका जणू काचेवरच तरंगत असल्याचे भासते. शिलाँगपासून ८५ किमी अंतरावर भारत-बांगलादेश सीमेजवळ पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील दावकी गावातून ती वाहते. लोक तिला पर्वतराजीत लपलेला स्वर्ग मानतात. येथील स्वच्छतेस खासी आदिवासी समुदायातील पूर्वापार परंपरा कारणीभूत आहे. स्वच्छता त्यांच्या संस्कारातच आहे. ज्येष्ठ नागरिक त्यावर निगराणी करत असतात. उमनगोत दावकी, दारंग व शेंगांडेंग या गावांतून वाहते. या गावातील लोकांवर नदी स्वच्छतेची जबाबदारी आहे. हवामान व पर्यटकांच्या संख्येनुसार महिन्यात एक, दोन किंवा चार दिवस "कम्युनिटी डे' साजरा केला जातो. या दिवशी गावातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती नदी व आसपासचा परिसर स्वच्छ करण्यासाठी येते. गावात ३०० घरे आहेत व सर्व लोक मिळून स्वच्छता करतात. येथे स्वच्छतेचे पालनही सक्तीने केले जाते. घाण केल्यास ५ हजार रुपयांपर्यंत दंड लावला जातो. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत सर्वात जास्त पर्यटक येथे येतात. मान्सूनमध्ये येथील बोटिंग बंद असते.

X
COMMENT