आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India's Democracy Index Falls 10 Points, The Lowest Score In 13 Years Due To Kashmir And CAA

काश्मीर आणि सीएएमुळे भारताची डेमोक्रेसी इंडेक्समध्ये 10 अंकाची घसरण, 13 वर्षातील सर्वात कमी स्कोर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिली डेमोक्रेसी इंडेक्स 2006 मध्ये जारी केली होती, तेव्हा भारताचा स्कोर 7.68 होता

नवी दिल्ली- भारताची डेमोक्रेसी इडेंक्समध्ये 10 अंकानी घसरण होऊन 51 व्या पोझिशनवर आला आहे. 2019 मध्ये भारताचा डेमोक्रेसी स्कोर 6.9 होता, जो मागील 13 वर्षातील सर्वात कमी आहे. द इकोनॉमिस्टने मंगळवारी 165 देशांची डेमोक्रेसी लिस्ट जारी केली. या रिपोर्टनुसार, काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे आणि नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यामुळे भारताच्या डेमोक्रेसी स्कोरमध्ये घट झाली आहे.

5 मुद्द्यांच्या आधारावर डेमोक्रेसी इंडेक्स जारी केली जाते

द इकोनॉमिस्टने 2006 मध्ये डेमोक्रेसी इंडेक्स जारी करने सुरू केले होते. तेव्हापासून आतापर्यंत 13 वर्षातील भारताचा हा सर्वात कमी डेमोक्रेसी स्कोर आहे. 2014 मध्ये हा स्कोर सर्वात जास्त 7.92 होता. डेमोक्रेसी इंडेक्स निवडणूक प्रक्रिया आणि अनेकतेची स्थिती, सरकारची कार्यप्रणाली, राजकीय भागीदारी, राजकीय संस्कृती आणि सामाजिक स्वातंत्र्यासारख्या 5 मुद्द्यांवर जारी केली जाते. 

2019 मध्ये भारतात खूप उलथा-पालथ झाली

रिपोर्टनुसार, या सर्व मुद्द्यांना पाहता 2019 मध्ये भारतात खूप उलथा-पालथ झाली. सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राजकीय मतभेद निर्मा झाले. सीएएला सर्व देशात भेदभाव असलेल्या कायद्याप्रमाणे पाहण्यात आले. या सर्वांचा परिणाम 2019 मध्ये भारतातील सामाजिक स्वातंत्र्यता आणि त्याच्या लोकशाहीवर पडला.

भारताच्या डेमोक्रेसी स्कोरमध्ये 13 वर्षातील घट
 

         वर्षे                       डेमोक्रेसी स्कोर           
20067.68
20087.8
20107.28
20117.3
20127.52
20137.69
20147.92
20157.74
20167.81
20177.23
20187.23
20196.9
बातम्या आणखी आहेत...