आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India's Diamond Industry Likely To Lose Rs 8,000 Crore In 2 Months Due To Emergency Declaration In Hong Kong

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाँगकाँगधील इमरजंसीमुळे भारतातील डायमंड इंडस्ट्रीला 2 महीन्यात 8000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूरतवरुन दरवर्षी 50,000 कोटी रुपयांचे पॉलिश्ड हीरे हाँगकाँगला एक्सपोर्ट केले जातात

सूरत- कोरोना व्हायरसमुळे सूरतमधील हीरे उद्योगाला 2 महीन्यात 8,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीतील जानकारांनी सांगितले की, सूरतच्या डायमंड इंडस्ट्रीसाठी हाँगकाँग एक मोठे केंद्र आहे, पण तिथे कोरोना व्हायरसमुळे इमरजंसी घोषित करण्यात आली आहे. यामुळेच हिरे व्यापारावर त्याचा प्रभाव पडू शकतो. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिलचे रीजनल चेअरमॅन दिनेश नवादिया यांनी सांगितले की, दरवर्षी सूरतवरुन 50,000 कोटी रुपयांचे पॉलिश्ड हीरे हाँगकाँगला एक्सपोर्ट होतात. हे सूरतच्या एकूण डायमंड एक्सपोर्टच्या 37% आहे.

देशातील 99% हीरे सूरतमध्ये पॉलिश होतात

नवादिया यांनी सांगितले की, हाँगकाँगमध्ये मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या आहेत. गुजरातच्या ज्या व्यापाऱ्यांचे तिथे ऑफिस आहे, त्यांना परत पाठवण्यात आले आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर याचा व्यापारावर मोठा परिणाम पडेल. देशात आयात होणाऱ्या हिऱ्यापैकी 99% सूरतमध्येच पॉलिश होतात.

ज्वेलरी बिझनेसलाही नुकसान होण्याचा शक्यता

हीरे व्यपारी प्रवीण नानावती यांनी सांगितले की, हाँकाँगमध्ये पुढच्या महिन्यात इंटरनॅशनल ज्वेलरी एग्जिबिशन आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे हा कार्यक्रम रद्द होऊ शकतो. असे झाले तर सूरतच्या ज्वेलरी बिझनेसला मोठे नुकसान होईल, कारण या इंटरनॅशनल एग्जिबिशनमध्ये हिऱ्यासोबतच ज्वेलरीदेखील विकल्या जाते. तिथे मिळणाऱ्या ऑर्डरवरुन आम्ही वर्षभराचे टार्गेट ठरवतो.